*सरपंच रमेश नेहरकर यांच्या विकास कामाची गती सुरूच*
*सरपंच रमेश नेहरकर यांच्या विकास कामाची गती सुरूच*
गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक गावचे सरपंच रमेश नेहरकर यांच्या रूपाने वडगाव ढोक गावला एक विकाभिमुख नेतृत्व भेटलं आहे मा.सरपंच साहेब यांनी सरपंच पदभार स्वीकारल्यानंतर गावातील सर्वच विकास कामे अतिशय जलद गतीने होत आहेत मग त्यामध्ये गावातील सर्वच रस्ते, नाल्या, पाण्याची सोय असो किंवा मग लाईट सुविधा असो अश्या अनेक समस्या त्यांनी मार्गी लावल्या व स्वतः च्या गावाला विकसित केले.
खर तर सर्व आजूबाजूला व सर्कलमध्ये असणाऱ्या गावातील नेतेमंडळी व सरपंच जिल्हा परिषद सदस्य किंवा मग कोणताही राजकीय नेता या सर्वांनी सरपंच मा.रमेश नेहरकर यांचा आदर्श घ्यायला पाहिजे. मा.सरपंच साहेब हे गावातील माता-भगिनी असो किंवा मग वयस्कर व्यक्ती असो सर्वांना आपुलकीने बोलणार व आपण स्वतः सरपंच आहोत या नात्याने नव्हे, तर गावकऱ्यांचा मुलगा व तरुण वर्गाचा मित्र अश्या नात्याने ते राहतात.
त्यांच्या याच वागण्यामुळे त्यांचा पंचक्रोशीत मोठा राजकीय प्रभाव आहे. या सर्व विकास कामामुळे रमेश नेहरकर यांचे राजकीय, सामाजिक, धार्मिक व पंचक्रोशीतील सर्व लहान थोर व्यक्तींकडून त्यांचे भरभरून कौतुक होत आहे.