ब्रेकिंगमहाराष्ट्रव्यवसाय

अतिक्रमण काढण्याची पालिकेची मोहीम म्हणजे गरीब उद्ध्वस्त आणि श्रीमंत मस्त-सागर भैय्या बेग 

अतिक्रमण काढण्याची पालिकेची मोहीम म्हणजे गरीब उद्ध्वस्त आणि श्रीमंत मस्त-सागर बेग 

 

*श्रीरामपूर(प्रतिनिधी):- शहर हद्दीतील अतिक्रमण काढण्याची पालिकेची मोहीम म्हणजे गरीब उद्ध्वस्त आणि श्रीमंत मस्त अशा पद्धतीने चालू असून अनेक वर्षापासून व्यवसाय करणाऱ्याना व्यावसायिकाला जर अतिक्रमणाच्या नावाखाली संपवण्याचा घाट कोणी घालत असेल तर राष्ट्रीय श्रीराम संघ त्यास रस्त्यावर उतरून विरोध करेल असा इशारा राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी दिला आहे.*

श्रीरामपूर नगरपालिकेची अतिक्रमण विरोधी मोहीम हा जिल्ह्यात सध्या चर्चेचा विषय होऊन बसला आहे. आठ दिवसापूर्वी व्यावसायिकांना पालिकेने नोटीस दिल्यानंतर पालिका अतिक्रमण अधिकारी व कर्मचारी यांनी मंगळवारी अतिक्रमण निर्मूलन कार्यक्रम मोठ्या पोलीस फौज फाट्यासह दोन जेसीबी घेऊन मोठ्या धडाक्यात बेलापूर रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यापासून सुरुवात झाली.राजकारण्यांच्या भरवशावर अतिक्रमणीत व्यवसायिक गाफील राहिले पण पालिकेने सकाळपासूनच पोलीस बंदोबस्तात मोहीम चालू केल्याने व्यावसायिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले सकाळी नऊ वाजता चालू झालेली मोहीम दुपारी पाच वाजेपर्यंत चालू होती.

व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व करत बुधवारी २९ जानेवारी रोजी अतिक्रमण निर्मूलन विरोधात शहरातील व्यापाऱ्यांना घेऊन राष्ट्रीय श्रीराम संघाच्यावतीने पालिकेवर भव्य मोर्चा नेण्यात आला त्याप्रसंगी सागर बेग हे बोलत होते.ते पुढे म्हणाले की,शहरात खूप इमारती या अनधिकृत आहेत त्याबाबत पालिका अधिकारी काही बोलायला तयार नाहीत.शिवाजी महाराज मार्गावर असलेली वेस्टन हाईट व सोनार गल्लीतील गोल्ड मार्केट या इमारती या अनधिकृत असल्याने पालिकेने त्या निष्कासित करने बाबत संबंधितांना दोन नोटिसा व एक अंतिम नोटीस अशा एकूण तीन नोटीस दिलेल्या आहेत पण अद्यापपर्यंत राजकीय दबावाखाली आजपर्यंत त्या अनधिकृत इमारती आजही तशाच उभ्या आहेत.काहींनी वेस्टन हाईट इमारतीबाबत आंदोलन,उपोषण केले त्यांनाच हाताशी धरून अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठात त्याबाबत याचीका दाखल करून मोठी तोडपाणी करून प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचा बनाव केलेला आहे ते सर्व सत्य लवकरच बाहेर येईल पण गरीब व्यावसायिकांना पालिका अतिक्रमणाच्या नावाखाली जर त्रास देत असेल तर अशा व्यावसायिकांच्या मागे राष्ट्रीय श्रीराम संघाची ताकद उभी राहील अशी ग्वाही यावेळी सागर बेग यांनी व्यावसायिकांना दिली.पालिका हद्दीत अनधिकृत मदरसे,मशिदी आणि दर्गे यांची माहिती ही माहिती अधिकारात मागवूनही पालिका ती माहिती देण्यास उत्सुक नसल्याचे सांगत बेग म्हणाले की अनधिकृत मदरसे,दर्ग्यावर पालिकेने हातोडा मारण्याची धमक दाखवावी अन्यथा आम्हाला ती कारवाई करावी लागेल असा इशाराही बेग यांनी यावेळी पालिकेला दिला.

भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी यावेळी व्यावसायिकांना दिलासा देत पालिकेच्या नियमानुसार पन्नास फुटांवरून कारवाई चाळीस फूट करण्याची मागणी त्यांनी यावेळी पालिकेला केली अनधिकृत इमारतीवर कारवाई ही पालिकेला करावीच लागेल त्यासाठी राष्ट्रीय श्रीराम संघाला भाजप पक्षाकडून सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही नितीन दिनकर यांनी दिले.पण अनधिकृत बांधकामांना सोडून गरीब व्यावसायिकांना पालिकेने त्रास देऊ नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.याप्रसंगी आम आदमी पार्टीचे तिलक डूंगरवाल,स्वंतत्र वीर सावरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित मुथा,गौतम उपाध्ये यांची देखील याप्रसंगी भाषणे झाली.

काहीकाळ पलिकेसमोर रस्ता रोकोसह निषेध सभा झाल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात भाजपचे ज्येष्ठ नेते दिपक अण्णा पटारे,सागर बेग,नितीन दिनकर,तिलक डुंगरवाल,नागेशभाई सावंत,दत्ताभाऊ खेमनर यांनी मुख्याधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून गरीब व्यावसायिकांना न्याय देण्याची मागणी केली तर शहर विकासासाठी माझी याठिकाणी पोस्टिंग झाली असून अतिक्रमनामुळे शहर विद्रूप होत असेल तर सर्वांनी त्याचे समर्थन न करता पालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

3.3/5 - (3 votes)
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे