श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचा पालखी सोहळा 29 जून रोजी पंढरपूर कडे होनार प्रस्थान
*श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचा पालखी सोहळा 29 जून रोजी पंढरपूर कडे होनार प्रस्थान*
ॐ चैतन्य श्रीगहीनीनाथ महाराज व प्रतस्मरणीय श्री संत वामणभाऊ महाराज पादुका पालखी सोहळा श्री क्षेत्र गहिनीनाथ गड ते श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पायी श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथुन प्रस्थान बुधवार दि 29 / 6 / 2022 रोजी दुपारी 2 ते 4 प्रस्थान होनार आहे तेव्हा या सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महंत विठ्ठल महाराज शास्त्री श्री क्षेत्र गहिनीनाथ गड यांनी केले आहे
सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र पंढरपूर येथील विठुरायाला भेटण्यासाठी श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावरून प्रातःस्मरणीय संत वामनभाऊ महाराज त्यांनी प्रारंभ केलेला हा पालखी सोहळा याही वर्षी महंत श्री ह भ प विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या अधिपत्याखाली याही वर्षी मोठ्या थाटात हा पालखी सोहळा दिनांक 29 रोजी मोठ्या लवाजम्यासह प्रस्थान होणार असून या दिंडी सोहळ्याचे योग्य नियोजन आणि प्रयोजन करण्यात आले आहे तेव्हा भाविकांनी मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी होऊन या सोहळ्याची शोभा वाढवावी असे आव्हान महंत विठ्ठल शास्त्री महाराज यांनी केले आहे हा सोहळा दिनांक बुधवार दिनांक 29 रोजी श्री नाथांचे व श्रीगुरु परंपरांचा अभिषेक करून सांगळे यांच्या प्रित्यर्थ त्यांच्या नातवा कडून दुपारी भोजन करून दोन ते चार या वेळेत प्रस्थान होणार आहे तर रात्रीचा मुक्काम निवडुंगा ता. पाटोदा येथे होणार आहे
गुरुवार 30 रोजी वाहाली सावरगाव मुगगाव वनवेवाडी मातकुळी डोंगर आणि मातकुळी मैदान येथे मुक्काम होणार आहे
शुक्रवार दिनांक एक जुलै रोजी जरे वस्ती जामदरवाडी जामखेड विठ्ठल मंदिर जगदाळे वस्ती श्री संत वामनभाऊ महाराज गड जामदार वाडी आणि सारोळा येथे मुक्काम होईल
शनिवार दिनांक दोन जुलै रोजी सारोळा वस्ती खुर दैठण घोडेगाव आपटी पिंपळगाव वस्ती आणि पिंपळगाव उंडा येथे मुक्काम होईल
रविवार दिनांक तीन जुलै रोजी पिंपळगाव वस्ती जवळके सटवाईचे जाधव वस्ती शिंदे वस्ती चिंचपूर मशिदीचे कोठे भिलारेल वस्ती पांढरेवाडी आटोळे वस्ती शेळगाव आणि तांदळवाडी येथे मुक्काम होईल
सोमवार दिनांक 4 जुलै रोजी देऊळगाव कसाबाचे डोंजे बंगाळवाडी आणि मिरगव्हाण येथे मुक्काम होईल
मंगळवार दिनांक पाच जुलै रोजी मिरगव्हाण वस्ती नागोबाचे हिवरे सालसे आळसुंदे वस्ती आणि मूर्तीचे वरकुटे येथे मुक्काम होईल
बुधवार 6 जुलै रोजी मूर्तीचे वरकुटे रोपळे रिंगण आठरे भोगे वस्ती आणि भोगेवाडी येथे मुक्काम होईल
गुरुवार दिनांक सात जुलै रोजी ढवळस पिंपळखुंटे अंबड शिराळाचे कोठे भेंड आबा पाटील आणि आरण सावता बाबाचे यांचे मुक्काम होईल सुभाष जी सुराणा मुरड
शुक्रवार दिनांक आठ जुलै रोजी बार्डी जाधववाडी पवार वस्ती पाटा वरील मेंढापूर मेंढापूर पाटील वाडा पादुका रिंगण माजी आमदार भीमराव धोंडे यांचे भोजन आणि रात्री श्री क्षेत्र पंढरपूर येथे मुक्काम होणार आहे तेव्हा या सर्व सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा सोबत येताना वळकटी ताट तांब्या आपल्या असणाऱ्या आजाराचे औषध गोळ्या बरोबर आणावेत त्याचप्रमाणे बॅटरीही बरोबर असावी पडशी असावी असे आवाहन श्री शेत्र गहीनाथ गडाचे महंत ह भ प विठ्ठल महाराज यांनी केले आहे