गुन्हेगारी

श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील पंधरा सराईत गुन्हेगार हद्दपार.

श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील पंधरा सराईत गुन्हेगार हद्दपार.

श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत वारंवार माला विरुद्ध तसेच शरीराविरुद्ध गुन्हे करणारे चार सराईत गुन्हेगारांचे पोलीस अधीक्षक नगर यांच्याकडे व उपविभागीय दंडाधिकारी   श्रीरामपूर यांच्याकडे 11 हद्दपार प्रस्ताव पाठवण्यात आले होते. पोलीस अधीक्षक नगर यांनी 4 व उपविभागीय दंडाधिकारी यांनी 11 हद्दपार प्रस्ताव मंजूर दिली असून त्यांच्याकडून हद्दपार आदेश प्राप्त झाल्याने सदर गुन्ह्यातील खालील नमूद आरोपींना हद्दपार आदेशाची बजावणी केली असून त्यांना श्रीरामपूर, राहता, कोपरगाव, राहुरी, नेवासा, वैजापूर तालुका हद्दीतून एक, दोन वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे.

यामध्ये अब्दुल गणी कुरेशी वार्ड नंबर 2, एजाज कादर कुरेशी मोहल्ला वार्ड नंबर 2, अरबाज मस्तान शेख नवीन तहसील कार्यालय समोर वाड 1, गौरव मंगेश सोनटक्के राहणार पंजाबी कॉलनी वॉर्ड 1, सागर भाऊराव कुदळे राहणार राऊत वस्ती अशोक नगर फाटा निपाणी वडगाव, शाहरुख खालील कुरेशी वार्ड नंबर 2, जुबेर राऊत कुरेशी वार्ड नंबर 2, अरबाज एजाज बागवान वार्ड नंबर 2, अरबाज आयोग पठाण वार्ड नंबर 1 बबलू दिलीप शेळके वॉर्ड नंबर 1 , सौरभ संजय शिंदे वार्ड नंबर 1 मोसिम उर्फ बंदी इसा कुरेशी वार्ड नंबर 2, रामप्रसाद रत्नाकर वांदे मार्केट यार्ड जवळ वार्ड नंबर 6, ओंकार उर्फ भोला शंकर साळवे राहणार निपाणी वडगाव, सोमनाथ भाऊराव कुदळे राहणार निपाणी वरील प्रमाणे प्राप्त हद्दपार आदेशाची तात्काळबजावणी करून सराईत आरोपींना श्रीरामपूर, राहता, कोपरगाव, राहुरी, नेवासा, वैजापूर तालुका हद्दीच्या बाहेर सोडण्यात आले आहे .वरील नमूद आरोपी हे कोणतीही पूर्व परवानगी न घेता त्यांना हद्दपार केलेल्या तालुका हद्दीन मिळून आल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांना आवाहन करण्यात आले की सदरच्या आरोपी श्रीरामपूर राहता कोपरगाव राहुरी नेवासा वैजापूर तालुका हद्दीत दिसून आल्यास तात्काळ श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला माहिती दिल्यास त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल व माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असेही आवाहन श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.

4/5 - (1 vote)
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे