रुसलेल्या नवरदेवाची सासऱ्याकडे चक्क रस्त्याची मागणी
रुसलेल्या नवरदेवाची सासऱ्याकडे चक्क रस्त्याची मागणी
नांदगाव तालुक्यातील बोल ठाण येथील एका विवाह सोहळ्यात रुसलेल्या नवरदेवाने सासऱ्या कडे चक्क रस्त्याची मागणी करून सर्वाची धांदल उडवली. लग्न कार्यामध्ये नवरदेव रुसणे, रुसलेल्या नवरदेवाचा हट्ट सासर्याने पुरवणे हे पाहतो अनुभवतो सोन्याची वस्तू किंवा गाडी यासारख्या मागण्या नवरदेवा कडून होतात व सासरच्या मंडळीकडून त्या पूर्णही केल्या जातात मात्र रस्त्याच्या आगळ्यावेगळ्या मागणीमुळे सर्वांचीच धांदल उडाली.
याबाबत सविस्तर असे की बोल ठाण येथील प्रगतशील शेतकरी सतीश रिंढे यांची कन्या ऋतुजा हीचा विवाहसोहळा गोपाळ वाडी तालुका गंगापूर येथील चि जयेश याच्या बरोबर काल दिनांक १७/४/२०२२ संपन्न झाला.नवरदेव व त्यांच्या बरोबर येणाऱ्या वऱ्हाडी मंडळी ला बोलठाण येथे पोहोचण्यासाठी मनेगाव फाटा ते धरण हा ३किमी रस्ता वरून प्रवासासाठी १ तास लागल्याने व त्यामुळे झालेल्या मानसिक त्रासामुळे सर्वच मेटाकुटीला आले होते. विवाह प्रसंगांमध्ये पायघड्या टाकण्यात आल्यानंतर नवरदेव रुसतो व त्यानंतर त्याचा रुसवा दूर करण्यासाठी सासू सासरे त्याची मागणी पूर्ण करतात.मात्र या नवरदेवाने मला काही नको आपण फक्त मनेगाव फाटा चा रस्ता करा अशी मागणी करून सर्वांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला हात घातला.आत्ता पर्यंत कधीच अशी मागणी झालेली नसल्याने ही मागणी सध्या परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.
मनेगाव फाटा हा रस्ता नाशिक व औरंगाबाद जिल्हा जोडणारा मुख्य रस्ता असून आरोग्य सेवा,शिक्षण सेवा,सरकारी कामे,यासाठी प्रामुख्याने वापरला जातो.रस्त्यावरून प्रवास करतांना होणाऱ्या मरणासन्न यातना ह्या सार्वजनिक बांधकाम विभाग,जिल्हा परिषद,लोकप्रतिनिधी यांना दिसत नाही हे मात्र नवलच आहे.रस्ता हा त्याविभागाच्या गावाच्या विकासाचा महत्वाचा घटक असतो.परंतु आधुनिक काळात आपली मुलगी ज्या ठिकाणी विवाह करून नांदण्या साठी जाणार आहे त्याठिकाण चे रस्ते ही पाहिले जातात या रस्त्याची झालेली दुरवस्था पाहता यामुळे अनेक विवाह मोडले तर अनेक विवाह खोळंबल्या याचेही पहावयास मिळते.
नवरदेवाच्या या मागणीने लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते राजकीय पुढारी सर्वांनाच एक उपदेश केला आतातरी रस्त्याविषयी आपण गंभीर व्हा व सर्व सामान्य नागरिकांची होणारी गैरसोय टाळा. वधूपित्याने आम्ही आमदार खासदार यांच्याकडे पाठपुरावा करून रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले.
प्रतिक्रिया।
औरंगाबाद व नाशिक जिल्हा सीमेवर असलेल्या या रस्ताचे जवळपास वीस वर्षापासून कोणतेही काम झालेले नाही या रस्त्यासाठी ग्रामस्थांनी आमदार खासदार यांच्याकडे अनेकदा प्रयत्न केलेले आहे, पाठपुरावा केला आहे आंदोलन केले आहे तरीही अद्याप पर्यंत हा रस्ता मार्गी लागत नाही.-
प्रल्हाद रिंढे ग्रामस्थ बोलठाण.