ब्रेकिंग

टाकळीमिया हे गाव एक कुटुंब आहे. आमच्या कुटुंबाच्या वादात बाहेरचे कोणी ही पडू नये आमचा वाद आम्ही मिटवायला समर्थ -. जाधव.       

 

        टाकळीमिया हे गाव एक कुटुंब आहे. आमच्या कुटुंबाच्या वादात बाहेरचे कोणी ही पडू नये आमचा वाद आम्ही मिटवायला समर्थ -. जाधव.       

टाकळीमिया ग्रामसभेत शिवाजी महाराज स्मारक उभारण्या वरुन झालेला वाद जिल्हाभर पोहचला असला तरी टाकळीमिया हे गाव एक कुटुंब आहे. आमच्या कुटुंबाच्या वादात बाहेरचे कोणी ही पडू नये आमचा वाद आम्ही मिटवायला समर्थ आहे. बाहेरील व्यक्तींनी विष पेरुन खतपाणी घालून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे.मी स्वतः आठवले गटाच्या आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष होतो.परंतू ग्रामसभेत खरा प्रकार कोणी ही जाणून न घेता विनाकारण टाकळीमिया गावास बदनाम केले जात आहे.झालेल्या घटनेचा मी साक्षीदार असुन जी सत्य बाजु आहे. सत्याच्या बाजुने उभे राहण्याची शिकवण डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजाच्या विचारातून आपल्याला मिळते. जिल्हाध्यक्ष यांनी कोणतीही शहानिशा केली नसल्यामुळे मी स्वतः आरपीआयचा जिल्हा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.यागावात सर्व समाज गुण्या गोविंदाने नांदत आहे.या पुढे आम्ही सर्व समाज एकञ राहणार आहे.बाहेरील व्यक्तींनी घडलेल्या घटनेची शहानिशा केली असती तर हा प्रकार गावातच मिटला असता.परंतू त्यांना हि घटना मिटवायची नव्हती.असे आरपीआयचे माजी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी सांगितले आहे.

शिवस्मारकावरून झालेल्या घटनेची सत्यता सर्वासमोर यावी म्हणून त्यानी येथील गावचे ग्रामदैवत मियासाहेब बाबांच्या दर्ग्यात पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी जाधव बोलत होते.

गावात भव्य शिवस्मारक व्हावे यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत स्मारकासाठी शिवस्मारक कमेटी ठरवणे, त्यासाठी जागेचे नियोजन, त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करणे तसेच शासकीय परवानगी मिळवणे हा उद्देश होता. सभेला सुमारे 700 ते 800 ग्रामस्थ उपस्थित होते सर्वांनी एकमुखाने लोकवर्गणीतून स्मारक उभारावे या साठी सहमती दर्शवली त्याचबरोबर येथे नवीन होणार्‍या वाचनालयास डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा ठराव संमत करण्यात आला असे असताना त्या ठिकाणी आलेल्या त्या महिलेने व पतीने प्रथम आंबेडकरांचे स्मारक झालेच पाहिजे व ते होणार नसेल तर शिवस्मारकही नको अशी भुमिका घेऊन एकप्रकारे महाराजांच्या स्मारकास विरोधच केला अशी भावना शिवप्रेमींची झाली त्यामुळे तेथे वाद निर्माण झाला. त्या महिलेने यांनी 5 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा मागे घ्यावा यासाठी संपूर्ण गाव बंद ठेवून राहुरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला.

आर पी आय संघटनेचे जिल्हा नेत्वृत्व व इतर पदाधिकारी यांच्या पासुन वादाचा मुद्दा लपवून ठेवून वेगळीच माहिती दिली. त्यांनी म्हटले होते की, शिवस्मारक होते ही चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर आंबेडकर, शाहू, आण्णाभाऊ, फुले यांचेही स्मारक व्हावे असे म्हटले असल्याचे सांगितले हा विषय ग्रामसभेत मांडला असता तर वाद होण्याचे कारण नव्हते . प्रत्येकाला ग्रामसभेत बोलण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाने आपले मत मांडणे ही लोकशाही आहे. परंतु आपल्या बोलण्यातून वाद निर्माण होणार नाही याचे भान ठेवले पाहिजे.असे जाधव यांनी सांगितले.

जाधव पुढे म्हणाले की,महाराष्ट्राचे दैवत शिवाजी महाराजांचे स्मारक होते ही अभिमानाची गोष्ट आहे . शिवाजी महाराज, डाॅ आंबेडकर, छत्रपती शाहू, आण्णाभाऊ साठे, महात्मा फुले ही लहान माणसे नाहीत. मी गेल्या 22 वर्षापासून आर पी आय आठवले गटाचा पाईक आहे. परंतु आता मी माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे. याचा खुलासा करणे गरजेचे आहे . असे सांगताना ते म्हणाले की, आपण आपल्या संघटनेचे काम करताना संघटनेचा उद्देश, डाॅ आंबेडकर यांचे विचार समाजासमोर मांडणे, जातीयवाद निर्माण होणार नाहीत याची काळजी घेणे, तसेच सर्वांशी समन्वय साधून सर्वांना बरोबर घेऊन चालणे ही संघटना पदाधिकाऱ्यांची जबाबदारी असते. परंतु येथे झालेल्या घटनेची कुठलीही शहानिशा न करता चुकीच्या माहितीतून समाजात चुकीचा संदेश देण्याचे काम सध्या सुरू आहे. जिल्हा नेत्वृत्व करणारे पदाधिकारी यांनी या घटनेची पूर्ण माहिती घेणे गरजेचे होते. या गावात त्यांचा सन्मान होतो. गावातील चार प्रतिष्ठीत लोकांशी किंवा गावात असणारे आपल्या संघटनेचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून शहनिशा करणे गरजेचे असताना व घटनेची सत्यता जाणुन न घेता टोकाचे पाऊल उचलणे व संघटनेतील पदाधिकारी यांना अपशब्द वापरून चुकीचे समर्थन करणे ह्या सर्व बाबींमुळे राजीनामा दिल्याचे जाधव यांनी सांगितले.

जाधव पुढे म्हणाले शिवाजी महाराजांच्या स्मारकानंतर सर्वच महापुरुषांचे स्मारक होतील . परंतु सध्या शिवस्मारकाचा विषय असताना अविचाराने विरोध करणे हा महापुरूषांचा अपमान आहे. गावातील लोक सर्व धर्मांचे लोकांच्या कार्यक्रम, सणवार, चांगल्या वाईट गोष्टीसाठी एकमेकांच्या पाठीमागे उभे राहतात अशा एकोप्याने नांदत असलेल्या गावात विष पेरण्याचे काम कुणी करू नये ते सहन केले जाणार नाही असा इशारा जाधव यांनी दिला.

पत्रकार परिषदे नंतर पत्रकारांनी येथील शामराव निमसे यांच्याशी चर्चा करून विषय समजुन घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सांगितले की, पिढ्यानपिढ्या पासून ह्या गावाने सर्व जाती धर्माचे लोकांना बरोबर घेऊन चालण्याचा वारसा जपला आहे. या गावात आतापर्यंत अशी घटना घडली नाही. परंतु आता हे प्रथमच घडले आहे.भविष्यात या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सर्व ग्रामस्थांनी जागृत राहणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

या पत्रकार परिषदेस डाॅ तनपुरे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान संचालक व मियासाहेब पतसंस्थेचे अध्यक्ष शामराव निमसे, सुभाष करपे, उपसरपंच सुभाष जुंदरे, वैभव पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश भानुदास करपे, ज्ञानदेव निमसे, साहेबराव निमसे, प्रभाकर करपे, सुरेश निमसे

सुभाष चोथे, राहुल चोथे, संदीप विधाटे, सतिष चोथे,गुलाब निमसे, भाऊसाहेब पगारे , जिजाबा चिंधे, भागवत नवाळे याच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे