ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

बारा वर्षे एकाच ठेकेदाराकडून शहरातील व्यापाऱ्यांकडून ठेक्याच्या नावाखाली पैसा वसूल;वसूल केलेला पैसा पालिकेत भरणा नाही.राजकीय शक्ती उघड केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.सागर बेग 

बारा वर्षे एकाच ठेकेदाराकडून शहरातील व्यापाऱ्यांकडून ठेक्याच्या नावाखाली पैसा वसूल;वसूल केलेला पैसा पालिकेत भरणा नाही.राजकीय शक्ती उघड केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.सागर बेग 

 

*श्रीरामपूर(प्रतिनिधी):- श्रीरामपूर नगरपालिकेत काँग्रेसचे नगराध्यक्ष दोन उपनगराध्यक्ष तालुक्याचे आमदार होऊन गेलेल्या प्रभागात छोट्याशा गाळ्यात सलून व्यवसाय करणारा बारा वर्षापासून शहरात व्यापाऱ्यांकडून कोट्यावधी रुपयांची वसुली करतो तक्रार केल्यानंतर पालिका तो बेकायदा वसुली ठेका रद्द करते.ठेक्याच्या नावाखाली काँग्रेसी पिलावळ पोसणारा खरा राजकीय काँग्रेसी सूत्रधार लवकरच जनतेसमोर उघडा होणार असल्याचा सूतोवाच राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी केला आहे.*

 

                 श्रीरामपूर नगरपालिकेत अर्ध शतकापासून काँग्रेसची एकहाती सत्ता राहिलेली आहे त्या सत्तेच्या माध्यमातून काँग्रेसी पिलावळ पोसण्यासाठी व स्वतःच्या तिजोऱ्या भरण्यासाठी पालिकेत ठेकेदारी पद्धत सुरू झाली.शहराच्या मुख्य रस्त्यांवर शासकीय जागेवर मुख्य पाईपलाईनवर अतिक्रमण करून टपऱ्या टाकण्यास कार्यकर्त्यांना पाठबळ दिले गेले तर त्या टपऱ्या व गाळे धारक व्यापाऱ्यांकडून प्रत्येकी दहा रुपये दैनिक वसुलीचा ठेका हा २०१२ च्या अगोदर वसुली विभागातील कर्मचाऱ्यामार्फत वसूल केला जात होता.त्यांनतर तत्कालीन काँग्रेसी सत्ताधाऱ्यांनी आपली पिलावळ पोसण्यासाठी श्रीरामपूर नगरपालिकेत ठेका पद्धत आणली.या ठेका पद्धतीत काँग्रेसचा राजकीय म्होरक्यानी त्यांची राजकीय सुरुवात काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्या प्रभागातून केली होती त्याच प्रभागातील एका माजी उपनगराध्यक्षाच्या जवळील गाळ्यात सलून व्यवसाय करणारा एक सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या नावावर वसुली ठेका चालू केला.त्या ठेक्याची रक्कम मुदतीत न भरल्याचा खोटा फार्स तयार करून तो ठेका त्याच्याकडून तात्पुरता काढून घेतला आणि त्याच्यावर राजकीय कडी करत त्याच्याकडे वसुलीसाठी कामाला असलेल्या एका व्यक्तीच्या नावाने ठेका पूर्ववत चालू केला.एक वर्षांनंतर तो ठेका त्याच्याकडूनही काढून ठेकेदार विळसकर याने तो ठेका बायकोच्या नावाने चालू केला.त्याच्या बायकोने सुद्धा पालिकेत वसूल रक्कम भरणा केली नाही तरी सुद्धा त्यांच्यामागे जबरदस्त राजकीय शक्ती असल्याने ठेकेदार आजही उजळ माथ्याने शहरात फिरत आहे.कोणाच्या दबावामुळे नगरपालिका प्रशासन बारा वर्षे एकाच ठेकेदाराकडून शहरातील व्यापाऱ्यांकडून ठेक्याच्या नावाखाली पैसा वसूल करून घेत आहे व वसूल केलेला पैसा पालिकेत भरणा सुद्धा करत नाही एकाच व्यक्तीला ठेका देत आहे त्यामागील काँग्रेसी राजकीय शक्ती उघड केल्याशिवाय राष्ट्रीय श्रीराम संघ स्वस्थ बसणार नसल्याचे सागर बेग यांनी म्हंटले आहे.

        शहरातील गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त करून स्वतःच स्वतःची पाठ थोपटणाऱ्या अधिकाऱ्यांनी या ठेकेदारावर लवकरात लवकर कारवाई करावी व व्यापाऱ्यांकडून त्याने वसूल केलेला पैसा पालिका फंडात भरावा तो पैसा भरत नसेल तर त्या ठेकेदाराच्या संपत्तीवर नगरपालिकेचा बोजा चढवावा त्याशिवाय अशा ठेकेदारांना पाठबळ देणाऱ्या काँग्रेसी पुढाऱ्यांच्या खरा चेहरा जनतेसमोर उघडा पडणार नसल्याचे सागर बेग यांनी म्हंटले आहे.

5/5 - (1 vote)
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे