प्रतिकुल परिस्थितीत मुरकुटे दाम्पत्याने शैक्षणिक कार्य उभे केले – डॉ. जयश्री थोरात*
प्रतिकुल परिस्थितीत मुरकुटे दाम्पत्याने शैक्षणिक कार्य उभे केले – डॉ. जयश्री थोरात*
– भारतीय शिक्षणप्रणाली जगात सर्वश्रेष्ठ – *अनुराधा नागवडे*
प्रतिकुल परिस्थितीत मुरकुटे दाम्पत्याने शैक्षणिक संस्था उभारून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील शहरी भागातील शिक्षणाप्रमाणे शैक्षणिक सुविधा देण्याचा स्तुत्य उपक्रम या माध्यमातून हाती घेतला असे प्रतिपादन राज्याचे महसुल मंत्री ना. थोरात यांच्या कन्या एकविरा संस्थेच्या संस्थापिका डॉ. जयश्री थोरात यांनी माऊली प्रतिष्ठानच्या प्रार्इड ॲकॅडमीच्या नुतन शाळेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी केले. या नवीन उभारणी केलेल्या शैक्षणिक संस्थेतून नक्कीच चांगले विद्यार्थी घडतील व ते पुढे प्रगत शिक्षण घेऊन उच्चविभुषीत होतील अशी ग्वाही देते,
पंचायत समितीच्या मा. सभापती तथा प्रार्इड अकॅडमीच्या संस्थापिका डॉ. वंदना मुरकुटे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या व शाळेच्या वाटचालीचा प्रवास मांडला. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी,संस्कृत, हिंदी ,मराठी भाषेतून पाहुण्यांचा परिचय करून दिला. आपल्या प्रास्ताविकपर भाषणात त्या म्हणाल्या की, शैक्षणिक क्षेत्रात काम करत असतांना सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा,साहित्य व राजकीय क्षेत्रातील अनुभवाचाही फायदा याठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी करण्याचा नक्कीच प्रयत्न राहिल. टाकळीभान येथील या नुतन शाळेच्या माध्यमातुन आम्ही सुरु केलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये आणखी एका शैक्षणिक संस्थेची आपणा सर्वांच्या आशिर्वादाने भर पडली आहे
कार्यक्रमासाठी मा. नगराध्यक्षा अनुराधा आदिक, ह.भ.प आरती ताई शिंदे, अशोकराव कानडे, जेष्ठ नेते नानासाहेब पवार, आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. आदिक आपल्या भाषणात म्हणाल्या की, ज्ञानाबरोबर अध्यात्मही याठिकाणी दिल्याने संस्कारक्षम पिढी घडण्याचे काम होईल असे प्रतिपादन केले. तसेच अशोक कानडे म्हणाले की डॉ.वंदनाताई व माऊली हे विठ्ठल रुक्माईची जोडी असून शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून संसंस्कृत पिढी घडवण्याचे पवित्र काम त्यांनी हाती घेतले असल्याचे म्हटले. टाकळीभान येथील राजेंद्र कोकणे व ग्रामस्थांनी मुरकुटे दांपत्याचा सत्कार केला.
या कार्यक्रमाप्रसंगी जि.प सदस्य शरद नवले किशोर बकाल, अभिषेक खंडागळे, सुदाम पटारे, गणपतराव औताडे, सचिन मुरकुटे, नितीन भागडे, मंजाबापू थोरात ,दादासाहेब कोकणे, दिलीप पवार, बाळासाहेब लेलकर, भाऊसाहेब पटारे, चित्रसेन रणनवरे, प्रभाकर पटारे, राधाकृष्ण वाघुले, शांताराम तुवर, विराज भोसले, विलास थोरात, समीन बागवान, आबा आसने,, राहुल पटारे, आबा पवार, आबासाहेब रणनवरे,समीर शेख, , प्रा. जयकर मगर, गणेश गायधने, रंजन जाधव, विविध संस्थेचे पदाधिकारी, ग्रामस्थ शाळेचे पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते,