टाकळीभान येथे मध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ.
टाकळीभान येथे मध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ.
श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथे केंद्र शासन, महाराष्ट्र शासनाच्या वतीने नोंदणीकृत कामगारांना मध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ आज दिनांक १२ सप्टेंबर
रोजी टाकळीभान भाजपाच्या वतीने माजी सभापती नानासाहेब पवार व अनुलोम सामाजिक संस्थेच्या सुनंदा आदिक यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलतांना सुनंदा आदिक म्हणाल्या की,
महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांना होणाऱ्या जेवणाची अडचण विचारात घेऊन बांधकाम कामगारांना कामाच्याठिकाणी “मध्यान्ह भोजन योजना’ सुरू केलेली आहे. नोंदणीकृत कार्डधारक कामगार आहेत त्यांनी दरवर्षी नोंदणी रेनिव्ह करावी
ज्या कामगारांची नोंदणी नाही आशा कामगारांनी नोंदणी करावी तसेच वीटभट्टीवर काम करणारे जे लोक आहेत त्यांचीही नोंदणी करावी.
महाराष्ट्रात १८ लाख ७५ हजारपेक्षा जास्त नोंदणीकृत कामगार, मजूर असून नोंदणीकृत कामगारांना सामाजिक सुरक्षा, शैक्षणिक, आरोग्य विषयक व आर्थिक योजनेद्वारे विविध लाभ दिले जात आहे. शासनाच्या सर्व योजनेंचा लाभ सामान्य लोकापर्यंत मिळण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत व या मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सुनंदा आदिक यानी केले.
यावेळी माजी सभापती नानासाहेब पवार, मुकुंद
हापसे, नारायण काळे, परशूराम आदिक यांनी मनोगत व्यक्त केले.
माजी सरपंच भाऊसाहेब मगर,
ठकसेन खंडागळे, संजय पवार, भाजपाचे मुकुंद हापसे, नारायण काळे, प्रताप लोखंडे भारत गुंजाळ, ऋषिराज हापसे गजानन लोखंडे तसेच कामगार उपस्थित होते.
टाकळीभान— येथे नोंदणीकृत कामगारांना मध्यान्ह
भोजन योजनेचा शुभारंभ आज माजी सभापती नानासाहेब पवार व सुनंदा आदिक यांच्या हस्ते करण्यात आला. यावळी भाऊसाहेब मगर, प्रताप लोखंडे, मुकुंद हापसे, नारायण काळे, भारत गुंजाळ, अविनाश लोखंडे, गजानन लोखंडे आदी.