शिंदे फडणवीस सरकारने सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करुन एकरी 50 हजार अनुदान त्वरीत द्यावेत व ओला दुष्काळ जाहीर करावा =सुरेशराव लांबे पाटील
शिंदे फडणवीस सरकारने सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करुन एकरी 50 हजार अनुदान त्वरीत द्यावेत व ओला दुष्काळ जाहीर करावा =सुरेशराव लांबे पाटील
गेल्या अनेक दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रमाणापेक्षा सतत मोठ्या प्रमाणात पाऊस चालू असून शेतकऱ्यांचे सोयाबीन कपाशी घास कांदा पिके उपळून चालले असून मुख्य पिक असलेल्या ऊसालाही मोठ्या प्रमाणात हुमनी आळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,तरी शासनाने कृषी अधिकारी तलाठी व ग्रामसेवक यांना सर्व पिकाचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत व एकरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुका अध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी केली,
पुढे बोलताना लांबे यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडताना सांगीतले गेली दोन वर्षापासून अतिवृष्टी कोरोना महामारी लॉक डाऊन व शेतकऱ्यांचा जोडधंदा असलेला दूध धंदा भाव नसल्यामुळे तोट्यात गेला,रासायनिक खते,बी बियाणे,डिझेल पेट्रोल,कृषी औषधे,पशुखाद्य,यांच्या किमंती गगनाला भिडल्या यात शेतकऱ्यांची मोठे नुकसान झाले, त्यातच गेल्या अडीच वर्षांमध्ये महाविकास आघाडीचे ठाकरे पवार सरकार यांनी शेतकऱ्यांना कुठलेच अनुदान दिले नाही अजूनही अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी ही झालेली नाही अशा परिस्थितीमध्ये चालू वर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीन कपाशी घास कांदा ऊस व फळबागा हे सर्व पिकांची लागवड केली असून सततच्या पावसामुळे हातात तोंडाशी आलेली पिक हे उपळुन चालले आहेत म्हणून महाराष्ट्र राज्यामंध्ये नवीनच स्थापन झालेले शिंदे फडणवीस सरकारने नुसत्या घोषणा करन्यापेक्षा सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना प्रति एकरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई अनुदान शेतकऱ्यांच्या बॅक खात्यामंध्ये त्वरित जमा करुन कष्टकरी शेतक-याला आधार द्यावा व महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुका अध्यक्ष सुरेशराव लांबे यांनी केली,