सार्वजनिक रस्ता बंद करून अतिक्रमण चालू असलेले बांधकाम हटवणार.. उपसरपंच कान्हा खंडागळे.
सार्वजनिक रस्ता बंद करून अतिक्रमण चालू असलेले बांधकाम हटवणार.. उपसरपंच कान्हा खंडागळे.
टाकळीभान प्रतिनिधी: टाकळीभान येथील स्टँड परिसरात रस्ता बंद करून, बांधकाम चालू असलेले बांधकाम हटवणार असून, सदर अतिक्रमण बांधकामची पाहणी व पंचनामा टाकळीभान ग्रामपंचायतचे प्रभारी ग्रामविकास अधिकारी प्रदीप ढुमणे यांनी केली आहे असे उपसरपंच कान्हा खंडागळे म्हणाले. पूर्वीपासूनच्या असलेल्या सार्वजनिक रस्त्या बंद करूनअतिक्रमण बांधकाम करता येणार नाही, सदरअतिक्रमणधारकांना ग्रामपंचायत नोटीस काढणार असून, न ऐकल्यास कायदेशीर मार्गाने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण बांधकाम ग्रामपंचायत मार्फत काढण्यात येईल, जनतेचा रस्ता मोकळा करू असे, खंडागळे म्हणाले.
रस्ता बंद करून झालेले अतिक्रमित बांधकाम बेकायदेशीर असून पाहणी व पंचनामा केलेला आहे, सदर अतिक्रमण धारकास ग्रामपंचायत मार्फत नोटीस काढण्यात येईल व अतिक्रमण न काढल्यास ग्रामपंचायत प्रशासनामार्फत अतिक्रमण काढले जाईल.प्रदीप ढुमणे -प्रभारी ग्रामविकास अधिकारी यांनी सांगितले,