नामदार थोरात यांच्या विशेष प्रयत्नातून निळवंडे साठी 202 कोटी ………..

य
निळवंडे पाटपाणी कृती समितीकडून थोरात यांचे विशेष अभिनंदन. निळवंडे प्रकल्पासाठी एका वर्षात निधी मिळण्याचे सर्व विक्रम नामदार थोरात त्यामुळे मोडले गेले आहेत. मंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यापासून निळवंडे पूर्ण करण्याचा ध्यास घेऊन प्रकल्पातील अनेक अडथळ्यांचे निराकरण करण्याचे काम नामदार थोरात यांनी लीलया पार पाडले आहे .त्यामुळेच निळवंडे प्रकल्प वेगाने पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे .नाबार्डकडून मिळवलेल्या निधीबद्दल त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुरावा वरिष्ठ पातळीवर असलेल्या स्नेहसंबंध अर्थात गुडविल चा वापर याची चुणूक पहावयास मिळाली.
अवघ्या तीन महिन्यात निधी मिळवणे ही सोपी गोष्ट नाही प्रस्ताव सादरीकरणानंतर नाबार्डच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची साईट भेट व त्या भेटीमध्ये भूसंपादन प्रकल्पांच्या कामाचा वेळ या गोष्टींचा प्रकर्षाने विचार केला जातो परंतु नामदार थोरात साहेबांमुळे कोरोना चा कालखंड असतानाही भूसंपादन पूर्ण होऊन प्रकल्पाच्या कालव्यांच्या कामात झालेला कायापालट या बाबी लक्षणीय ठरल्याआहेत. नाबार्डच्या वरिष्ठ अधिकारी उमा महेश मॅडम यांच्या प्रत्यक्ष भेटीनंतर नामदार थोरात यांनी दाखवले ली तत्परता याचे फलित म्हणजे नाबार्ड कडून मिळालेली 202 कोटी रुपये होय. निळवंडे पाटपाणी कृती समिती व लाभधारक शेतकऱ्यांच्या वतीने नामदार थोरात साहेबांचे विशेष आभार व अभिनंदन . या निर्णयामुळे निळवंडे पाटपाणी कृती समितीच्यावतीने मार्गदर्शक गोपीनाथ पाटील घोरपडे ,अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील वर्पे ,कार्याध्यक्ष गंगाधर पाटील गमे ,सामाजिक कार्यकर्ते,सचिव दादासाहेब पाटील पवार ,मच्छिंद्र पाटील एलम , संजय पाटील एलम, जालिंदर लांडे,रावसाहेब कोल्हे,रविंद्र वर्पे,डॉ रविंद्र गागरे,कीरण गव्हाणे,ह.भ.प.संजय महाराज शेटे,ह.भ.प.विनोद महाराज मुसमाङे,सोपानराव जोंधळे,अरूण पोकळे,विजय ढोकचौळे,नितीन गमे,रामनाथ बोर्हाडे,सुभाष निर्मळ,योगेश निर्मळ,राजेंद्र निर्मळ,विजय निर्मळ,अशोक खंडागळे,संदीप गमे,महादू कंदळ्कर,किशोर गागरे,हारदेदिपक,हारदे अनिल यांच्यासह निळवंडे पाटपाणी कृती समीती अहमदनगर नाशिक च्या लाभधारक शेतकरी बांधवांनी मा.ना.बाळासाहेब थोरात यांचे आभार व्यक्त करत आनंद साजरा केला.
राहुरी प्रतिनिधी
अशोक मंडलिक