भल्या पहाटे आरक्षणाची मशाल पेटली… पहाटे तीन वाजत मनोज जरांगे पाटलांची तोफ धडाडली*
*भल्या पहाटे आरक्षणाची मशाल पेटली… पहाटे तीन वाजत मनोज जरांगे पाटलांची तोफ धडाडली*
आळंदी/सकल मराठा समाजासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या मनोज जरांगे पाटलांची डोळ्यात तेल घालून पहाटे पर्यंत वाट पाहत उभा राहिलेला सकल मराठा समाज, दिवसाची रात्र आणि रात्रीची पहाट झाली तरीही मनामध्ये तो जोश आणि स्वागतासाठी अतुर झालेले जोडलेले हात. हे सर्व दृश्य आहे तीर्थक्षेत्र आळंदी देवाची येथील…. मनोज जरंगे पाटील यांचा महाराष्ट्रभर दौरा चालू आहे मराठा आरक्षणासाठी रान उठले आहे.आणि यातच आळंदी तीर्थक्षेत्री त्यांच आगमन होणार होते. त्यासाठी नियोजन ठरलं साडेनऊ वाजता म्हणून जरांगे पाटील येणार म्हणून मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी झाली. परंतु कार्यक्रमाचा रस्त्यातील ओघ काही पूर्ण होईना आणि शेवटी कसे बसे रात्री अडीच वाजता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आळंदीतील चाकण चौक येथे आगमन झाले. मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत करत
.क्रेनने भला मोठा हार त्यांच्या गळ्यात मराठा सकल समाजाच्या वतीने घालण्यात आला. एक मराठा लाख मराठा म्हणत आळंदी दुमदुमली आणि मिरवणुकीने चाकण चौक भैरवनाथ चौक लक्ष्मी माता मंदिर मार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जवळ रात्रीचे तीन ते सव्वातीन चे दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची तोफ धडाडली. आळंदीतील भल्या पहाटेच्या या उत्साह पूर्ण स्वागत याने मनोज जरांगे पाटील भारावून गेले. मराठा आरक्षणाची लढाईतील आळंदीतील हा ऐतिहासिक क्षण म्हणावा लागेल. कारण भल्या पहाटे ची ही सभा.तेवढीच अलोट गर्दी. तितकाच जल्लोष. तितका जोश .आज पर्यंतच्या सर्व सभांचे रेकॉर्ड तोडणारा ठरला. सकल मराठा समाजाला संबोधताना जरांगे पाटील कुठलेही प्रकारचा उद्रेक करू नका. एकजूट ठेवा. आरक्षण शंभर टक्के मिळणार आहे. याबाबत मला आता खात्री झाली कारण माऊलींच्या आळंदीमध्ये एवढ्या मोठ्या स्वरूपात महाराज मंडळींनी केलेला जल्लोष आणि स्वागत हे माझ्यासाठी ऐतिहासिक आहे. शंभर टक्केआरक्षण आता मिळणार आहे त्यामुळे कोणीही आत्महत्या करायची नाही. जाळपोळ करायची नाही. असे मत जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने आमच्या माता भगिनीवर शांततेत आंदोलन करत असताना त्यांची डोकी फोडली त्यांना मारहाण केली याचा उल्लेख जरांगे पाटील यांनी केला, तसेच जातीय दंगली घडून आणण्याचा कट आहे,मराठ्यांचा अपमान करायचा आणि ओबीसी मराठा जातीय दंगल घडवायची असा प्रकार असल्याने सर्वांनी शांततेत कुठलीही प्रतिक्रिया न देता शांत राहण्याच आवाहन त्यांनी केली. सरकार दिवस-रात्र 24 तास नोंदी शोधण्याचं काम करत आहे नोंदी निघाले आहेत माझे आरक्षण पक्के आहे आपल्याला यश मिळते याबाबतही त्यांनी वक्तव्य केलं एवढ्या मोठ्या प्रमाणात भल्या पहाटे तीन वाजता सकल मराठा समाजा आळंदी येथे एवढ्या मोठ्या प्रमाणात हजर असतील यावर माझा विश्वास बसला नाही तसे फोन हि येतं होतें परंतु वस्तुस्थिती खरी निघाली या प्रेमा बद्दल आपले आभार आणि माझ्या आयुष्यातील सर्वात ऐतिहासिक क्षण हा आळंदी भेटीचा आहे येथील भल्या पहाटे असणाऱ्या गर्दीचा आहे.महाराज मंडळींनी सदैव आशीर्वाद देत पाठीशी उभे राहिले हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.तसेच वारकरी संप्रदाय कधी राजकारण या फंदात पडत नाही. मात्र आज एक समाज बांधव म्हणून महाराज मंडळींनी हरिनामाच्या गजरामध्ये केलेले स्वागत आणि मोठ्या प्रमाणात महाराज मंडळींची असलेली उपस्थिती यामुळे आणि सकल मराठा समाज यांच्यास्वागताच्या जय्यत तयारी मुळे मनोज जरांगे पाटील मात्र भारावून गेलेले दिसले.पहाटे सव्वा तीन चार सुमारात एक मराठा लाख मराठा अशा घोषणाने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक दण दणाणून गेले.आळंदीत या घोषणा अंधार चिरत घुमू लागल्या आणि मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाची सुवर्ण संधी दिनांक चोवीस डिसेंबरला येणार आहे.आणि गोरगरिबांच्या.मराठा लेकरांना. नोकरी, शिक्षणाचा घास, मिळणार आहे याबाबत समाधान व्यक्त केले, समाज कानो कोपऱ्यातील बांधव माझ्या पाठीशी उभे राहिले,नोकरदार वर्ग,तळागाळातील सामान्य मराठा समाज सर्वांनी उचलून धरले,त्यामुळे जीवात जीव असेपर्यंत आणि जीव गेला तरी चालेल पण आरक्षण मात्र घेणारच.. हा पण मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवला. संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरामध्ये जरांगे पाटील यांनी दर्शन घेतल्यानंतर श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने जरांगे पाटील यांचे एडवोकेट विकास ढगे यांनी संस्थान कमिटीचे वतीने त्यांच स्वागत करण्यात आले