बकू पिंपळगाव येथे नागरिकांच्या न्याय हक्कासाठी होणार ग्रामपंचायत समोर उपोषण
बकू पिंपळगाव येथे नागरिकांच्या न्याय हक्कासाठी होणार ग्रामपंचायत समोर उपोषण
नेवासा तालुक्यातील बकु पिंपळगाव येथील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनावर बडगा उगारला असून ग्रामपंचायतच्या मनमानी कारभाराविरोधात तसेच जागे अभावी नागरिकांना सुख सुविधा तसेच शासकीय योजनांचा लाभ न घेता येत असल्यामुळे ग्रामपंचायत नागरिकांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ देत नसल्याचे म्हटले आहे त्याच कारण दाखवले जाते शासकीय कामे करण्यासाठी गावठाण हद्दीत खळे वाडगे सार्वजनिक शौचालय स्मशानभूमी गावठाण अंतर्गत रस्ते त्याप्रमाणे दलित वस्ती अंतर्गत असलेल्या योजनांचा लाभ जागे अभावी घेता येत नाही. असेही ग्रामस्थांची म्हणणे आहे.
गावाला हागणदारीमुक्त करण्यासाठी घर तेथे शौचालय देणे गरजेचे असताना शौचालय बांधणीच्या इच्छा असून तयारी असून देखील बांधता येत नाही वाढत्या लोकसंख्येनुसार गावठाण ची जागा अपुरी पडत असल्याचे दिसून येत आहे.
त्यासाठी ग्रामपंचायत ने वाढीव जागेचा प्रस्ताव मंजूर करावा नागरी सुविधांसाठी कमी पडलेली जागा ही शासनाने राखीव जागा ग्रामपंचायतीस वर्ग करण्यात यावी भूसंपादन खात्याने शासनाच्या मार्गदर्शक तत्वाद्वारे गावठाण साठी सातबारा नुसार जी जागा शेत नवीन गावठाण साठी संपादित केलेली आहे संपूर्ण जमीन ही ग्रामपंचायत हद्दीत घेऊन रेकॉर्डला नोंद करून घ्यावी.
संपादित केलेल्या जमिनीची ग्रामपंचायत दप्तरा मध्ये नोंद घेऊन तसेच शासकीय दप्तरी देखील नोंद व्हावी मूळ मालकाचा कुठलाही हस्तक्षेप नसावा शासन दप्तरी नोंद झालेली नसल्यामुळे मूळ मालक हक्क दाखवत असल्याकारणाने नागरिकांना तसेच ग्रामपंचायतीला जागेचा उपभोग घेता येत नसल्याचे नागरिकांनी निवेदनात म्हटले आहे.
तरी शासनाने ह्या जमिनीची ग्रामपंचायत तसेच शासन दप्तरी नोंद करून घ्यावी त्यामुळे नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेता येईल या कारणाने बकुपिंपळगाव येथील नागरिकांनी ग्रामपंचायतच्या विरुद्ध दंड थोपटले असून प्रश्न मार्गी न लावल्यास 30/10/2023 पासून ग्रामपंचायत समोर उपोषणास बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.