शासकीय जमिनीवर अतिक्रमण काढले नाही तर आत्मदहनचा इशारा

शासकीय जमिनीवर अतिक्रमण काढले नाही तर आत्मदहनचा इशारा
टाकळीभान येथील शासनाच्या मालकाच्या जमिनीवरील अतिक्रमण न काढल्यास मल्हार रणनवरे यांचे 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा…
टाकळीभान येथील गट क्रमांक 250 या शासनाच्या जमिनीवर केलेले अनधिकृत बांधकाम काढावे अन्यथा आत्मदहनाचा इशारा श्रीरामपूर तालुका वंचित बहुजन आघाडीचे सचिव राजेंद्र उर्फ मल्हार रणनवरे यांनी दिला आहे. त्यांनी या निवेदनाच्या प्रती विविध शासकीय कार्यालयांना दिल्या आहेत, यामध्ये नमूद केले आहे की, मौजे टाकळीभान येथे अतिक्रमण चालू असलेल्या शासनाचा गट क्रमांक 250 या ठिकाणी ग्रामपंचायत शेजारी अनधिकृतपणे महसुलाच्या नाकावर टिचून, दादागिरी करून, राजरोषपने अतिक्रमण दोन मजली बांधकाम चालू आहे व त्याबाबत प्रशासनाला वेळोवेळी बांधकाम चालू आहे याबाबत निदर्शनास आणून दिले आहे व टाकळीभानचे प्रथम नागरिक सन्माननीय सरपंच ग्रामपंचायत टाकळीभान यांनीही तुम्हाला कळविले आहे. प्रशासनाने शासकीय जागेवरील अतिक्रमण काढणे कायद्याने गरजेचे आहे, परंतु शासनाचे दुर्लक्ष होत आहे असे लक्षात येते जर शासनाला शासनाची जागा लोकांना देण्याची ठरवले असेल तर तसे पत्र आम्हाला द्यावे किंवा चालू असलेले अतिक्रमण दिनांक 14 ऑगस्ट 2022 च्या आत काढावे अन्यथा 15 ऑगस्ट 2022 मी स्वतः आत्मदहन करणार आहे याची सर्व जबाबदारी शासनाची राहील असे निवेदनात म्हटले आहे निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, महसूल मंत्री, उच्च न्यायालय मुंबई, जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय, तालुका ग्रामीण पोलीस स्टेशन, सरपंच/ ग्रामसेवक यांना देण्यात आल्या आहेत.