गरदरे कुटुंबातील महिलेला तिच्याच घरी तलवारी घेऊन जाऊन दडपशाही.

गरदरे कुटुंबातील महिलेला तिच्याच घरी तलवारी घेऊन जाऊन दडपशाही.
नवऱ्याला संपून टाकण्याची धमकी गुन्हा दाखल
राहुरी तालुक्यातील तिळापुर येथील गरदरे कुटुंब राहते. घरी एकटी महिला असल्याचे पाहून तिच्या घरी ११ जणांनी तलवारी ,लोखंडी गज, लोखंडी पाईप, लाकडी दांडा घेऊन जाऊन तुझ्या नवऱ्याला संपून. अशी दहशत केल्याने राहुरी पोलिसात 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, 28 /4/ 2025 रोजी संध्याकाळी सहा वाजून 30 मिनिटाच्या सुमारास मी माझ्या मुलगा दोघेजण घरामध्ये असताना, किशोर धर्मा जाधव, दादाहरी सोपान रोठे, भीष्मराज सोपान रोठे, पांडुरंग दौलत जाधव, हरिभाऊ बबन जाधव, संदीप अण्णासाहेब जाधव, गौरव रोठे, शिवाधर्मा जाधव, राहुल वामन जाधव, अण्णा रामदास जाधव, आदिनाथ जाधव हे आमच्या घरासमोर आले. त्यातील व माझ्या नवऱ्याला शिव्या देत होते. कोठे आहे तुझा नवरा त्याला आज सोडणार नाही. असे मोठ्याने आरडाओरडा करत होते.
त्याच वेळेस मी घराबाहेर येऊन डोकावून पाहिले असता त्यातील हरी बबन जाधव पांडू जाधव यांच्या हातात लाकडी दांडके, संदीप जाधव यांच्या हातात लोखंडी गज व दादा रोठे आणि किशोर जाधव यांच्या हातात तलवार दिसल्याने मी पुन्हा घाबरून घरामध्ये गेले. यावेळेस दादा रोटी व किशोर जाधव हे माझ्यामागे घरात घुसले. दोघांनी माझ्या हाताला धरून मला बाहेर ओढले व सर्वांनी घरात घुसून माझ्या पतीला घरामध्ये शोधले ते मिळून आले नाही. तेव्हा दादा रोठे याने माझ्या मुलाला घरात खेळत असताना त्याला लाथ मारली व मला घाण घाण शिवीगाळ केली. त्यावेळी ते तिथून जात असताना मला धक्का दिल्याने खाली पडले असता माझ्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र गहाळ झाली आहे ते अद्याप पर्यंत मिळून आले नाही. म्हणून bns 333,189(2),191(2),190,191(3),115(2),352,324(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन करत आहे