सायबर क्राईम ,सोशल क्राईम आणि रॅगिंग समाजाला लागलेला कलंक – API जीवन बोरसे
सायबर क्राईम ,सोशल क्राईम आणि रॅगिंग समाजाला लागलेला कलंक – API जीवन बोरसे
सायबर क्राईम, सोशल क्राईम आणि रॅगिंग समाजाला लागलेला कलंक आहे तो नष्ट केला पाहिजे असे प्रतिपादन श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनी केले. बेलापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग , विद्यार्थी विकास मंडळ, ग्रीव्हन्स सेल आणि जेटीएस शिक्षण संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. ते पुढे असेही म्हणाले की, आजही शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात रॅगिंग होत आहे. रॅगिंगसाठीची मानसिकता असणे तशी सामूहिक व्यवस्था निर्माण केली जात आहे म्हणून समाजातील प्रत्येक घटकाने सायबर क्राईम, सोशल क्राईम आणि रॅगिंग याविषयी चिंतन करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईल, इंटरनेट वरील क्राईमपासून दूर राहिले पाहिजे ,व्यसनांपासून दूर राहायला पाहिजे .उत्तम करिअर केले पाहिजे .स्वतःवर कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल होणार नाही याची काळजी घेतली पाहीजे .विद्यार्थी विद्यार्थिनींनी पळून न जाता आई-वडीलांच्या आणि शिक्षकांच्या संस्काराचा विचार केला पाहिजे . सायबर गुन्हे, ईमेलद्वारे होणारा छळ, फेसबुक ,व्हाट्सअप इंस्टाग्राम ,सायबर स्टॉकिंग, सायबर पोर्नोग्राफी, सायबर मार्किंग इत्यादी गुन्हेगारीचे प्रकार टाळले पाहिजेत असेही विचार त्यांनी मांडले तर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्या डॉ. गुंफा कोकाटे यांनी 1999 मध्ये रॅंगिंग प्रतिबंधात्मक कायदा झाल्याचे सांगितले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्टॅट्युटनुसार प्रत्येक विद्यार्थ्याकडून तो फॉर्म भरुन घेतला जातो .महाविद्यालयाची शिस्त राखणे, मोबाईल न वापरणे,ड्रेसकोड अनिवार्य,ओळखपत्र गळ्यात घालणे,गाड्या पार्किंग सुरळीत लावणे, नियमित तास करणे , कुणाच्या रंगाव्यंगावर बोलू नये,कुणी कुणावर रॅगिंग करु नये, भावनेच्या भरात वाहत जाऊ नये.सत्य असत्य,खरे खोटे याची जाण व वैचारिक भान विद्यार्थ्यांना येणे गरजेचे आहे हे सांगितले.उपप्राचार्य प्रा. सुनिता ग्रोव्हर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
विचारपीठावर बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त मा.बापुसाहेब पुजारी, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन राजेश खटोड,विश्वस्त,शेखर डावरे, रविंद्र खटोड ,मुख्याध्यापक
डी.डी.पुजारी,शिक्षक प्रतिनिधी प्रा.नामदेव मोरगे आदि उपस्थित होते.चर्चासत्राचे प्रास्ताविक डॉ.बाबासाहेब पवार यांनी केले.प्रा.रुपाली उंडे यांनी सुत्रसंचालन केले तर प्रा.प्रकाश देशपांडे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा.चंद्रकांत कोतकर,प्रा.रुपाली उंडे,ग्रीव्हन्स सेलचे डॉ व्ही.एन.काळे यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर सेवक वृंद यांनी परिश्रम घेतले.सदर चर्चासत्रासाठी ज्युनिअर व सिनियर कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.