ब्रेकिंगमहाराष्ट्र

मुलींनो निर्भय बना “भयमुक्त जीवन जगा’ :पो. नि. प्रतापराव दराडे. 

मुलींनो निर्भय बना “भयमुक्त जीवन जगा’ :पो. नि. प्रतापराव दराडे. 

समाजकंटकांना, टारगट ना कठोर इशारा. 

 

 

 

मुलींनो निर्भय बना, आपल्या करियर कडे लक्ष द्या तसेच भयमुक्त व्हा,आम्ही आपल्या मदतीला सदैव तयार आहोत असा मौलीक सल्ला राहूरी पो. स्टेशन चे पो. नि. प्रतापराव दराडे यांनी सात्रळ येथील ना. स. कडू पाटील विद्यालयातील आयोजित “मुक्त संवाद “मध्ये विधार्थी विद्यार्थिनींना दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिलिंद अनाप होते.कार्यक्रम ची सुरुवात युवा नेते किरण कडू यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून विद्यालयाने राबविलेले विविध उपक्रमाची माहिती देऊन”मुक्त संवाद “द्वारे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील व्यक्तीचे मार्गदर्शन,तसेच प्रमुख पाहुणेंचा परिचय करून दिला. राहुरी पो. स्टेशन च्या महिला पो. उपनिरीक्षक डोखे मॅडम यांनी विधार्थीनीना आपला मोबाईल नंबर देत आपल्याला कोणी टारगट त्रास देत असल्यास व्हाट्स उप द्वारे कळविण्याचे, तसेच तक्रारदाराचे नाव गुप्त राहील याचे खात्री देत त्वरीत कार्यवाही करण्याची ग्वाही देत सर्वांनी सहकार्य केल्यास गुन्हेगारी आटोक्यात येईल असे नमूद केले. आपल्या प्रमुख भाषणातून पो. नि. दराडे यांनी उपस्थित विधार्थी विधार्थीनीना शिक्षणाचे महत्व व स्वतःचे करिअर, लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन,भयमुक्त जीवन जगण्याचे आवाहन,स्त्री नेतृत्वाचे उदाहरणे, सायबर क्राईम ची माहिती,मोबाईल चा गैरवापर वा त्यातुन होणारी गुन्हेगारी , बाल विवाह तसेच टारगटाना कठोर इशारा देत “भयमुक्त राहूरी, गुन्हेगारी मुक्त राहुरी “चे आवाहन, अश्या अनेक पैलू आपल्या भाषणातून उल्लेख करून उपस्थितांचे मन जिंकली. याच कार्यक्रमात शाळेचे माजी विधार्थी योगेश गांधी यांनी आपले परदेशातील अनुभव मांडून विद्यार्थाना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास सूर्यभान शिंदे,नंदूभाऊ कडू, लक्ष्मणराव अंत्रे, सागर डुक्रे, बलराज डुक्रे, सोनगाव चे सरपंच अनिल अनाप, हर्षद कडू, तुषार तनपुरे, विद्यालयाचे प्राचार्य ससाणे, शिक्षक शिक्षिका, प्रशांत कडू, पत्रकार सुनील सात्रळकर, पत्रकार संभाजी कडू, पत्रकार समर्थ वाकचौरे, पत्रकार अनिल वाकचौरे, दत्तू पडघलमल, पो. स्टेशनचे सोमनाथ जायभाय,अशोक शिंदे तसेच ग्रामस्थ उपस्तिथ होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिराज मन्सुरी यांनी केले.

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे