स्वतंत्र रोहीत्र बसवीण्याची कुऱ्हे वस्तीवरील नागरीकांची मागणी
स्वतंत्र रोहीत्र बसवीण्याची कुऱ्हे वस्तीवरील नागरीकांची मागणी
–येथील कु-हे वस्ती भागामध्ये कमी दाबाने तसेच खंडीत वीज पुरवठा होत असल्याने नविन रोहिञ(डी.पी)बसवावेत अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी महावितरणचे सहाय्यक अभियंता मिलिंद दुधे यांचेकडे निवेदनाव्दारे केली. आहे महावितरणला दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी पुढे म्हटले आहे की बेलापूर गावातील कु-हे वस्ती परिसरात असलेले रोहिञ ओव्हरलोड होते.यामुळे दाबनियमनात सातत्य राहात नाही.अनेकदा कमी दाबाने वीज पुरवठा होतो.यामुळे अनेकदा कृषीपंप जळतात.नियमीत दाबाने वीज पुरवठा होत नसल्याने पीकांना विहिरीस पाणी असून पाणी देता येत नाही.यामुळे पिकांचे नुकसान होते ,तसेच वीज नसल्याने वस्त्यांवरील लोकांना अंधारात राहावे लागते.यामुळे या परिसरात राञीच्यावेळी भितीचे वातावरण असते याकडे लक्ष वेधण्यात आले.त्यामुळे ह्या परिसरासठी नविन रोहिञ बसविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणला निवेदन देण्यात आले होते या वेळी,गोरक्षनाथ कु-हे,केदारनाथ कु-हे ,मधुकर अनाप,तान्हाजी कु-हे ,कारभारी भगत,केशव कु-हे ,विशाल आंबेकर,अशोक कु-हे ,बापुसहेब कु-हे ,विजय कु-हे ,सुनिल जाधव,महेश कु-हे ,अमोल कु-हे ,महेश भगवान कु-हे ,प्रकाश साळुंके ,आदित्य बिगरे,सागर धनसिंग ,अक्षय पवार आदि उपस्थित होते.