श्रीरामपूर,राहुरी,नेवासे मध्ये पिकांचे नुकसान पंचनामा होऊन शासकीय मदत मिळवी- नानासाहेब जुंधारे

श्रीरामपूर,राहुरी,नेवासे मध्ये पिकांचे नुकसान पंचनामा होऊन शासकीय मदत मिळवी- नानासाहेब जुंधारे
श्रीरामपूर राहुरी नेवासा या भागामध्ये परतीचा पाऊस जास्त प्रमाणात झाल्यामुळे तोंडी आलेला घास शेतकऱ्यांच्या तोंडून हिसकून घेतल्यासारखं प्रकार घडला आहे. जास्त पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आह शासकीय यंत्रणेमार्फत तात्काळ याचे सरसकट पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत होणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांनी जास्ती पैसे खर्च करून पिके उभे केली होती शेतकऱ्यांची कपाशी मका तूर यासारखी पिके पाण्याखाली आल्यामुळे जमिनी खालून पाणी वाहत आहे. त्यामुळे पिके उपळली आहेत या कारणामुळे शासकीय यंत्रणेमार्फत तात्काळ पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे.
अशी शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी जोर धरत आहे. श्रीरामपूर राहुरी नेवासा या भागातील तहसील यंत्रणेमार्फत तात्काळ पाहणी होऊन पंचनामे करण्याची गरज आहे. याकडे शासकीय यंत्रणा काय कार्यवाही करणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.
तात्काळ सरसकट पंचनामे करण्यात यावे यासाठी लवकरच तहसीलदार यांना निवेदन देणार आहे असे जूधारे यांनी बोलताना सांगितले



