धार्मिक
वांगी फाटा दत्त भगवान मंदिराचा चौथा वर्धापन दिन सोहळा

वांगी फाटा दत्त भगवान मंदिराचा चौथा वर्धापन दिन सोहळा
श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बु वांगी फाटा माने वस्ती येथे सोमवार दिनांक 23 3/2026 रोजी संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत दत्तात्रय भगवान मंदिर चौथा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. गुरुवर्य महंत भास्करगिरी जी महाराज यांच्या कृपाआशीर्वादाने व महंत स्वामी प्रकाशनंदजीगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव सोहळा पार पडत आहे. दरवर्षीप्रमाणे या कार्यक्रम प्रसंगी हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज नांगरे श्रीक्षेत्र बहिरवाडी यांचे जाहीर कीर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसाद होणार आहे.



