पत्रकार सोमनाथ मोटे यांच्यावर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याचा जाहिर निषेध

पत्रकार सोमनाथ मोटे यांच्यावर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याचा जाहिर निषेध
डिजीटल मिडीयाचे तहसिलदारांना निवेदन
गेवराई येथील डिजीटल मिडीया परिषदेचे सचिव सोमनाथ मोटे यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांने कुठलीही शहानिशा न करता खोटा गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषद , व डिजीटल मिडीया परिषदेच्या वतिने गेवराई तहसिलदार यांना निवेदन सादर करून निषेध नोंदविला आहे .
याबाबद सविस्तर माहिती अशी की , दि २० जानेवारी रोजी भाजपा च्या शिक्षक पदविधर निवडणुकीचे उमेदवार प्रा किरण पाटील यांच्या प्रचारार्थ गोदावरी सभागृह गेवराई याठिकाणी प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती याठिकाणी भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकूळे यांच्यात भाषणावरून शाब्दीक संवाद झाला त्यांची व्हिडीओ क्लीप प्रसार माध्यमावर व्हॉयरल झाली ज्या युट्यूब चॅनलचे नाव घेऊन पत्रकार सोमनाथ मोटे यांच्यावर गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल केला गेला आहे त्या युट्यूब चॅनल व सोमनाथ मोटे यांचा कसलाही संबंध नाही हे वास्तव आहे या घटनेच्या निषेधार्थ गेवराईचे तहसिलदार सचिन खाडे यांना याबाबद डिजीटल मिडीया परिषदेच्या वतिने निवेदन सादर करण्यात आले आहे यावेळी महाराष्ट्रा राज्य मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष जूनेद बागवान , डिजीटल मिडीया परिषदेचे तालुका अध्यक्ष अविनाश इंगावले , शेख जावेद सर , श्याम जाधव , देवराज कोळे , राजेंद्र नाटकर , शेख अफरोज , ईम्राण सौदागर , खदीर बागवान , ज्ञानेश्वर हवाले , सुभाष शिंदे , अमोल भांगे ,समिर सौदागर, ईम्राण सौदागर ईत्यादी पत्रकार बांधवाच्या स्वाक्षऱ्या आहेत .