ब्रेकिंगमहाराष्ट्र
किसान काॅग्रेसच्या राज्य सचिवपदी भवार.
किसान काॅग्रेसच्या राज्य सचिवपदी भवार.
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील भारत भवार यांची महाराष्र्ट राज्य किसान काॅग्रेस राज्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीचे पत्र महाराष्र्ट वैधानीक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हास पवार व नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डाॅ.सुधिर तांबे यांच्या उपस्थितीत नूकतेच देण्यात आले आहे. यावेळी राज्य काॅग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, मुंबई काॅग्रेस अध्यक्ष भाई जगताप, नसीम खान, संजय निरूपम आदी उपस्थित होते.
शेतकर्यांच्या न्याय हक्कासाठी, प्रश्नासाठी सातत्याने काम करत असलेल्या भवार यांच्या कामाची दखल घेत महाराष्र्ट राज्य काॅग्रेस अध्यक्ष नाना पटोले, माजी महसूल मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांच्या सुचनेप्रमाणे किसान सेलचे अध्यक्ष पराग पास्टे यांनी ही नियुक्ती केली आहे.