भोकर व खोकर फाट्यावर गतीरोधक बसवा अन्यथा ग्रामस्थांचा रास्ता रोको आंदोलन इशारा
भोकर व खोकर फाट्यावर गतीरोधक बसवा अन्यथा ग्रामस्थांचा रास्ता रोको आंदोलन इशारा
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर व खोकर फाट्यावर गतीरोधक बसवा अन्यथा ग्रामस्थांचा रास्ता रोको आंदोलन इशारा, श्रीरामपुर नेवासा राज्य मार्ग क्र, ५० या रस्त्याचे काम उत्कृष्ट दर्जाचे झालेले असल्यामुळे वाहनाचा वेग खुप प्रमाणात वाढला असल्याने भोकर व खोकर बस स्थानक चौकात त्वरीत गतिरोधक बसविण्यात यावे या मागणीसाठी ग्रामस्थ जगदंबा युवा प्रतिष्ठाणने मा.उपविभागीय अधिकारी तसेच सार्वजनीक बांधकाम विभाग, यांचेकडे निवेदनाव्दारे मागणी करत रास्ता रोको आंदोलनाचा ईशारा दिला आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की भोकर वडजाई माता परीसरातुन गावामध्ये शालेय विद्यार्थी, दुग्धव्यावसाईक मोठ्या प्रमाणात वर्दळ असते व खोकर फाटा येथे ही वर्दळ असते त्यामुळे बस स्टँन्ड चौकात गतीरोधक असणे गरजेचे आहे दररोज अपघाताची मालीका सुरु आहे. तरी पाच ते सहा दिवसात त्वरीत गतीरोधक बसवावेत अन्यथा भोकर फाटा येथे नेवासा श्रीरामपूर रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्याचा ईशारा निवेदनाव्दारे दिला आहे.
या निवेदनाच्या प्रती मा.तहसिलदार, श्रीरामपूर तसेच मा.पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर यांना देण्यात आलेल्या आहेत या निवेदनावर मा.अध्यक्ष सागर शिंदे, मा.उपसरपंच संजय डुकरे, विद्यमान उपसरपंच महेश पटारे, सोसायटी अध्यक्ष बाळासाहेब विधाटे, सोसायटी संचालक बाबासाहेब तागड, मा.उपसरपंच राजेंद्र चौधरी यांच्या सह्या आहेत.