मनोरीमध्ये बिबट्याचा मुक्त संचार पिंजरा लावण्याची मागणी.
मनोरीमध्ये बिबट्याचा मुक्त संचार पिंजरा लावण्याची मागणी.
राहुरी तालुक्यातील मानोरी येथील गणपत वाडी परिसरामध्ये बिबट्याचा मुक्त संचार आहे अनेक लोकांना या बिबट्याने दर्शन दिल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घाबरहाटीचे वातावरण पसरलं. काल रात्री दूध घालायला चाललेल्या शेतकऱ्याला रात्री साडेनऊ वाजता या बिबट्याचं दर्शन गणपत वाडी रोड परिसरात घडले. भाऊसाहेब चोथे यांच्या उत्सवाच्या शेतातून पूर्वेकडे बाळू काका वाघ यांच्या उसाच्या शेतात जात असताना हा बिबट्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास पडला त्यामुळे सदर शेतकऱ्याची चांगलीच भांबेरी उडाली त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेत या शेतकऱ्याने सदर ठिकाणावरून पळ काढला या परिसरात गेल्या काही दिवसापूर्वी देखील बिबट्याचा मुक्त संचार होता. आता शेतातील अनेक राणे मोकळे झाल्यामुळे हा बिबट्या अनेकांच्या निदर्शनास येतोय सदर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावावा अशी येथील शेतकरी व नागरिकांची मागणी होत आहे.