ब्रेकिंगमहाराष्ट्र

वांबोरी घाटात रात्रीच्या वेळी बिथरलेल्या अवस्थेतील घर सोडून आलेल्या मुलींना 112 कॉल च्या मदतीने तात्काळ केले कुटुंबीयांच्या स्वाधीन

 

 

 *वांबोरी घाटात रात्रीच्या वेळी बिथरलेल्या अवस्थेतील घर सोडून आलेल्या मुलींना 112 कॉल च्या मदतीने तात्काळ केले कुटुंबीयांच्या स्वाधीन* 

 

 

दिनांक १९.०१.२०२५ रोजी रात्री ०८.००वा सुमारास वांबोरी घाटामध्ये दोन अल्पवयीन मुली वय अंदाजे वर्ष 13 व 14 वर्षे या वांबरी गटातून पायी बिधरलेल्या मनस्थितीत घाट उतरत असताना दिसल्याने वांबोरी येथील मा.श्री. बाबासाहेब भिटे रा.वांबोरी ता.राहुरी यांनी सदर मुलींकडे चौकशी करून एवढं सायंकाळी त्या घाटात का बरं आहे अशी विचारणा केली असता त्यांनी श्रीगोंदा तालुक्यातील एका आश्रम शाळेतून आलेले आहे असे सांगून उडवा उडवीची उत्तरे दिली . परंतु श्री भिटे यांनी संध्याकाळची वेळ झालेली असल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सदर मुलीं ची आस्थेने चौकशी करून त्यांच्या बाबतीत राहुरी पोलीस स्टेशनला 112 नंबर वर कॉल करून तसेच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना फोनवर संपर्क साधून माहिती दिली व त्यांना स्वतःच्या घरी घेवुन जावुन त्यांना त्यांची पत्नी सौ. मंदा बाबासाहेब भिटे वांबोरी ता. राहुरी यांनी घरी जेवण दिले . त्याच वेळी मुलीं बाबत माहिती मिळाल्याने राहुरी पोलीस स्टेशन कडील पोलीस हवालदार वाल्मीक पारधी यांनी समक्ष जाऊन सदर मुलींची खात्री करून त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या मनातील नायरासे व भीती काढून अधिक माहिती घेतली असता त्यांनी त्यांची नावे प्रियका बापु बर्डे व वृषाली बापु बर्डे अशी सांगितली व त्या पिपळगांवमाळवी ता.नगर जि. अहिल्यानगर यागावातून निघून आलेले आहेत असे सांगितले. त्यावरून राहुरी पोलीस स्टेशन ने एम आय डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री चौधरी यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या नातेवाईकांना बोलावून सदर मुलींना आई मनिषा बापु बर्डे व आजोबा सुर्यभान बाबुराव माळी रा पिपळगांव माळवी ता. नगर जि. अहिल्यानगर यांच्या ताब्यात दिले. 

सदर मुलींच्या बाबतीत श्री बाबासाहेब भिंटे व सौ. मंदा बाबासाहेब भिंटे यांनी दाखवलेल्या समय सूचकतेमुळे 112 प्रणाली वर तसेच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना संपर्क साधल्याने त्यांचा पोलीस स्टेशनच्या वतीने आभार मानले.

 

1/5 - (1 vote)
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे