कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या जनावरांना गोरक्षकांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात

कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या जनावरांना गोरक्षकांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात
टाकळीभान,-( प्रतिनिधी)- श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे आज दिनांक १९ रोजी खिर्डी येथून श्रीरामपूरकडे कत्तलीसाठी गोवंशीय नर जातीचे ११ व १५ ते २० दिवस वयाची असलेली वासरे घेवून जाणारी गाडी आज दुपारी ४.३० ते ५ वाजेच्या सुमारास पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे.
खिर्डी येथून श्रीरामपूर कडे जाणारी टाटा कंपनीची गाडी क्रमांक एम एच १६ ए वाय ५००६ या वाहनातून गोवंशीय वासरे कत्तलीसाठी घेवून जात असल्याचे लक्षात आल्यावर त्या वाहनाचा पाठलाग करून ही गाडी पकडली. गोरक्षक राष्ट्रीय श्रीराम संघाच्या मदतीने ही गाडी पकडण्यात यश आले. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रीय श्रीराम संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते त्यानंतर या गाडीत कत्तलीसाठी नेत असलेली गोवंशीय नर जातीची लहान ११ वासरे आढळून आली. या घटनेची माहिती श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला भ्रमणध्वनीवरून देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येवून सदर वाहन किंमत १ लाख रूपये व ११ हजार रूपये किंमतीची वासरे ताब्यात घेण्यात आली आहे.
या गाडीत गोवंशीय नर जातीची ११वासरे हे महाराष्ट्र राज्यात गोवंश हत्या बंदी असतांना हत्या कत्तल करण्याचे प्रयोजनार्थ खरेदी करून कत्तलीसाठी गाडीत कोंबून घेवून जात असल्याचे आढळून आल्याने याप्रकरणी टेम्पो चालक खाजा मुहमद कुरेशी वय ३८ वर्ष राहाणार वार्ड नंबर २ श्रीरामपूर याच्यावर गु रजि नं व कलम २४/ २०२५ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ चे सुधारित कलम५(अ)(ब) ९,११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे.काँ. त्रिभुवन करीत आहेत.