टाकळीभान ग्रामपंचायतीच्या सदस्यांनीच रस्त्याचे व अंगणवाडी कंपाउंडचे निकृष्ट कामाबद्दल घरचा आहेर
टाकळीभान ग्रामपंचायतीच्या सदस्यांनीच रस्त्याचे व अंगणवाडी कंपाउंडचे निकृष्ट कामाबद्दल घरचा आहेर
श्रीरामपूर तालुक्यातील पूर्व भागातील टाकळीभान ग्रामपंचायत मोठी ग्रामपंचायत असून येथील कामाबाबत तक्रारी येत असून यावेळी तर ग्रामपंचायतीच्या सदस्यांनीच रस्त्याचे व अंगणवाडी कंपाउंडचे निकृष्ट कामाबद्दल घरचा आहेर दिला आहे. सविस्तर वृत्त असे की ग्रामपंचायतचे गावातील वार्ड क्रं.2 मधील रस्त्याचे काम सुरू असून हे काम निकृष्ट होत आहे या कामा साठी खडी म्हणून विहिरीचे डबर वापरले जात असून तेही खूप पातळ प्रमाणात वापरले जात आहे.त्याप्रमाणे रस्त्याचे काम करताना खालीही रस्त जास्त खोदण्यात आला नसून त्यावर काँक्रीट केल्यास रस्ता टिकणार नाही अशी परिस्थिती आहे.
तसेच वार्ड नं.6 मधील अंगणवाडी कंपाउंड करताना फूट भर पाया ही घेतला नसून सर्व काम बोगस चालू आहे. नुसती बिल काढणे असा उद्योग सुरू असून ग्रामपंचायत सदस्य सौ लता भाऊसाहेब पटारे व ग्रामपंचायत सदस्य अशोक कचे यांनी कॉन्ट्रॅक्टर नाना मांजरे यावर निकृष्ट व बोगस कामाबद्दल आरोप केले आहेत.
या सदस्यांचे म्हणणे आहे की टाकळीभान भानू राजाची नगरी तिला लाभलेला एक विश्वकर्मा म्हणजे हा कॉन्ट्रॅक्टर आहे. ग्रामपंचायतचे सर्व ठेके यांच्याकडे आहेत. गटार, कंपाउंड, रस्ते, रोडचे काँक्रीटीकरण,पेविंग ब्लॉक, संडासची आदी कामांसह, उरलेसुरले इमारतीला कलर देने आणि इतर सर्व कामात ऑल राउंडर असा कॉन्ट्रॅक्टर लाभला आहे. गेल्या वीस वर्षापासून सत्ताधारी या निकृष्ट काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला धार्जिन आहेत. अशी शोकांतिका यावेळी या सदस्यांनी व्यक्त केली. व ग्रामपंचायतच्या कारभारावर पुनश्च एकदा घरचा आहेर देऊन ताशेरे ओढले आहेत.
कोट:- हा कॉन्ट्रॅक्टर नसून थर्ड पार्टी काम करत आहे. बिला साठी खुपटी वडार, आणि बोर्डे कन्ट्रक्शन या नावे बिल काढत आहे आणि त्यास कामाच्या दर्जाबद्दल बोलल्यास वरून म्हणतो 20 वर्षात माझं कोणी काही करू शकत नाही. अशी भाषा करतो आहे, तरी सर्व विकास कामाची जिल्हा पातळी वरून चोकशी झाली पाहिजे असे आमचे म्हणणे आहे.
-ग्राम. सदस्य लता पटारे व ग्राम. सदस्य अशोक कचे