ब्रेकिंग

पत्रकार वारीसे खुन प्रकरणी कडक कारवाई व्हावी बेलापुरातील पत्रकाराची मागणी

पत्रकार वारीसे खुन प्रकरणी कडक कारवाई व्हावी बेलापुरातील पत्रकाराची मागणी

 

 

 

बेलापूर ( वार्ताहर) पत्रकारांवर हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असुन पत्रकार शशीकांत वारीसे यांच्या हत्येस जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी बेलापुर व परिसरातील पत्रकारांनी पोलीसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे .. पत्रकारवरील हल्ल्याबाबत पोलिसांनी तसेच शासनाने दखल घेवुन आरोपींना अटक करुन कठोर शासन करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे .रत्नागिरी येथील पत्रकार शशीकांत वारीसे यांनी वृत्तपत्रात बातमी छापली म्हणून त्यांना गाडीची धडक देवुन ठार मारण्यात आले अशा गुन्हेगाराला कठोर शासन व्हावे . पत्रकारांना

संरक्षण देण्याबाबत येणाऱ्या अधिवेशनामध्ये आवश्यक ते पावले उचलावीत असेही निवेदनात म्हटले आहे.

.बेलापूर येथे औटपोस्टचे हेड कॉ अतुल लोटके पोलिस हेड कॉ रामेश्वर ढोकणे भारत तमनर नंदु लोखंडे यांनी निवेदन स्वीकारले.निवेदनावर भास्कर खंडागळे अशोक गाडेकर देवीदास देसाई ज्ञानेश्वर गवले नवनाथ कुताळ शरद थोरात भरत थोरात दिलीप दायमा किशोर कदम दिपक क्षत्रिय सुहास शेलार आदीसह पत्रकारांच्या सह्या आहे. 

……

 

 

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे