आजीनी चप्पल घेतली नाही म्हणुन दहा वर्षीय चिमुकल्यांची आत्महत्या
आजीनी चप्पल घेतली नाही म्हणुन दहा वर्षीय चिमुकल्यांची आत्महत्या
आजीने चप्पल घेतली
नाही म्हणून दहा वर्षीय चिमुकल्याने आत्महत्या केली आहे. तो मामाच्या गावात शिक्षण घेत होता. युवराज श्रीमंत मोरे वय १० वर्ष (रा. बोडखा कासारी) ता. माजलगाव असे या आत्महत्या केलेल्या लहान बालकाचे नाव आहे. या मुलाच्या मृत्युने गावावर शोककळा पसरली आहे. मुलाचे आई-वडील आपली इतर पोटाची खळगी भरण्यासाठी व संसाराचा गाडा पुढे चालवण्यासाठी, वडील श्रीमंत मोरे हे आपल्या मेहुण्याजवळ त्यांचा मुलगा युवराज याला ठेवून गेले होते.
कारण मुलांना शिकावे, मोठे व्हावे व स्वतःच्या पायावर उभे राहावे, असे प्रत्येक वडिलांचे स्वप्न असते. या मुलाचे आई-वडील ऊसतोडणी मजूर आहेत. त्यामुळे आपल्या मुलाला आजीजवळ शिक्षणासाठी सोडून गेले होते. त्या मुलाने आपल्या आजीकडे चप्पल घेण्याची मागणी केली होती. मात्र घरात आर्थिक अडचण असल्याने आजीने चप्पल घेण्यास नकार दिला. याचाच राग त्याने मनात ठेवून आत्महत्या केली. आत्महत्या केल्याची ही हृदयद्रावक घटना सोमवारी दुपारी दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.हा मुलगा शिकावा मोठा व्हावा, अशी आई-वडिलांचे स्वप्न होते. म्हणून या दांपत्याने आपला मुलगा त्याच्या मामाच्या गावी शिक्षणासाठी ठेवला होता. मात्र घरची परिस्थिती गरिबीची असल्याने आजीने चप्पल घेण्यास नकार दिला. या किरकोळ कारणांनी युवराजला राग अनावर झाला. त्याने आई-वडिलांकडे जातो म्हणून तो रस्त्याने निघाला. वाटेतच त्याने आत्महत्या या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह धारूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. शवच्छेदन करण्यात आले.
या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. आजूबाजूच्या परिसरात मुलाच्या आत्महत्याने हळहळ व्यक्त होत आहे.