पालखीच्या स्वागताची पहील्यांदाच शासकीय अधिकाऱ्याकडून पहाणी बेलापुरकरांची तयारी पाहुन अधिकारीही भारावले.
पालखीच्या स्वागताची पहील्यांदाच शासकीय अधिकाऱ्याकडून पहाणी बेलापुरकरांची तयारी पाहुन अधिकारीही भारावले
-संत निवृत्तीनाथ महाराजाच्या पालखीचे श्रीरामपुर तालुक्यात आगमन होत असुन बेलापुर येथे मुक्कामी असणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होवू नये या करीता प्रथमच श्रीरामपुरचे उपविभागीय अधिकारी अनिल पवार तहसीलदार प्रशांत पाटील गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस श्रीरामपुर नगरपालीकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी बेलापूरात येवुन प्रत्यक्ष पहाणी केली व समाधान व्यक्त केले सर्व अधिकारी अचानक बेलापूरात दाखल झाले त्यांनी बाजार समितीच्या आवारात जावुन माहीती घेतली दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी पाच हजार वारकऱ्यांच्या भोजनाची निवासाची तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे बाजार समितीचे पदाधिकारी व व्यापाऱ्यांनी सांगितले त्यांनंतर सर्व अधिकारी विठ्ठल मंदिरात गेले तेथे निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीचा मान बेलापूरकरांना असल्याचे ग्रामस्थांनी अभिमानाने सांगितले तसेच मा जि प सदस्य शरद नवले उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी गावात सर्वत्र फवारणी करण्यात आली असुन पिण्याचे पाणी भोजन अंघोळ व राहण्याची करण्यात आलेली व्यवस्था पाहुन अधिकाऱ्यांनी समाधन व्यक्त केले या वेळी सर्व सोयी सुविधा बरोबरच आरोग्य तसेच शौचालयाची काय व्यवस्था आहे याचीही अधिकाऱ्यांनी माहीती घेतली जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व जिल्हा पोलीसा प्रमुख मनोज पाटील यांनी सोलापुर येथे पदाभार स्विकारलेला असल्यामुळे त्यांनी पालखीतील वारकऱ्यांची कुठलीही गैरसोय होवु नये अशा स्पष्ट सूचना दिलेल्या असल्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी बेलापूरात येवुन पहाणी केली या वेळी साहेबराव वाबळे राजेंद्र लखोटीया नंदु लढ्ढा जितेंद्र संचेती माऊली आंबेकर अनिल पुंड शोभासेठ लखोटीया रत्नेश कटारीया किरण गंगवाल दत्तात्रय जाधव सुनिल कोळसे डाँक्टर अविनाश गायकवाड विशाल आंबेकर विजू सोनवाणे निलेश नाईक अमोल गाढे सोपान महाराज हिरवे मा जि प सदस्य शरद नवले उपसरपंच अभिषेक खंडागळे रणजीत श्रीगोड पत्रकार देविदास देसाई प्रफुल्ल डावरे ऋतुराज वाघ हितेश बोरुडे मुकुंद चिंतामणी प्रमोद पोपळघट कामगार तलाठी ज्ञानेश्वर हाडोळे मयुर भगत मिलींद दुधाळ अरुण अमोलीक उपेंद्य कुलकर्णी हवालदार अतुल लोटके गणेश भिंगारदे निखील तमनर हरिष पानसंबळ रामेश्वर ढोकणे आकाश शिवदे गोलु राकेचा मंगेश भगत गणेश कोळपकर उपस्थित होते विठ्ठल मंदिरात सर्व अधिकाऱ्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.