गढी महाविद्यालयात स्वराज्य सप्ताह अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायन संपन्न*
*गढी महाविद्यालयात स्वराज्य सप्ताह अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायन संपन्न*
जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय शिवाजीनगर गढी येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त स्वराज्य सप्ताह अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायन दि.17 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी ठीक 11.00 वाजता महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाले.या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सांस्कृतिक विभाग आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या सामूह राष्ट्रगीत गायन कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सदाशिव सरकटे,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. रामहरी फाटक, प्रा. डॉ. राणी जाधव, प्रा. डॉ. शिवाजी काकडे,सांस्कृतिक विभागाचे प्रा. डॉ.संतोषकुमार यशवंतकर प्रा. डॉ. शिवलाल घुगे,प्रा. डॉ. आयोध्या पवळ, प्रा. रमेश रिंगणे, विद्यार्थी विकास विभागाचे प्रा. हिरा पोटकुले प्रा. डॉ.जयराम ढवळे प्रा.धर्मराज कटके यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.