मानोरी येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात सुरुवात

मानोरी येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात सुरुवात
राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील मानोरी येथे आज दिनांक 17 ऑगस्ट रोजी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताहस मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली या सप्ताह निमित्त गावातील हनुमान मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर आई रेणुका माता मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली तसेच हनुमान मंदिरा समोरील प्रांगणात भव्य दिव्य स्वरूपाचा मंडप उभारण्यात आला असून सकाळी गुरूंच्या हस्ते देव देवतांची विधिवत पूजा अर्चा करून पारायणात सुरुवात करण्यात आली सलग दोन वर्ष कोरोनाचे संकट असल्यामुळे साध्या पद्धतीने सप्ताह करण्यात आला होता परंतु या वर्षी ज्ञानेश्वरी पारायण वाचन करण्यासाठी भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी बघायला मिळाली सालाबाद प्रमाणे मानोरी येथील ग्रामदैवत श्री रेणुका मातेच्या कृपाशीर्वादाने हभप वैकुंठवासी बन्सी महाराज तांबे व ह भ प वैकुंठवासी भानुदास जी महाराज गायके यांच्या प्रेरणेने व ह भ प शंभू बाबा गोसावी महाराज ह भ प लक्ष्मण महाराज चौगुले ह भ प किशोर महाराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली भजनी मंडळ मानोरी व मानोरी ग्रामस्थांच्या सहकार्याने श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला असून या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन ह भ प नामदेव महाराज जाधव शास्त्री आळंदीकर हे करत आहेत या सप्ताह निमित्त दररोज पहाटे चार ते सहा काकडा भजन सकाळी सात ते अकरा ग्रंथराज ज्ञानेश्वरी वाचन सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ व रात्री आठ ते दहा जाहीर हरी कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे या सप्ताहासाठी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हजेरी लावणार असून जास्तीत जास्त भाविकांनी या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह चा लाभ घ्यावा असे मानोरी ग्रामस्थांकडून आव्हान करण्यात आले