खुनाची धमकी, पॉलिटिकल फंटाशी*
*खुनाची धमकी, पॉलिटिकल फंटाशी*
सर, महात्मा गांधींचा खून झाला.त्या आधी कोणी धमकी दिली नव्हती.”बापू, खबरदार!जर फाळणीला मान्यता दिली तर , तुम्हाला खल्लास करू.आम्ही हिंदू मुसलमान एकोप्याने राहू इच्छित आहोत.आमच्यात कोणताही धार्मिक मतभेद नाही.आणि तुम्ही स्वतः दुफळी निर्माण करीत आहात.नव्हे अखंड भारत ब्रम्हदेश पासून अफगाणिस्तान पर्यंत, श्रीलंका पासून नेपाळ पर्यंत इंग्रज आपल्या हाती एकगठ्ठा सोपवत आहेत.तरीही तुम्ही फाळणीला का सम्मती देत आहात?असे केले तर तुमचा खातमा करू.”अशी कोणतीही धमकी किंवा इशारा किंवा बातमी कोणीही हिंदू महासभा किंवा मुस्लिम लीग ने दिली नाही.तरीही बापूंचा खून झाला.बातमी आली ती फक्त बापूंच्या खुनाची आणि मृत्यूची.धमकीची नाही.
इंदिरा गांधींना कोणतीही धमकी किंवा सुचना किंवा संशय आला नाही.फक्त बातमी आली खुनाची.राजीव गांधींना कोणतीही धमकी किंवा सुचना किंवा संशय आला नाही.बातमी आली फक्त खुनाची.सीआयडी, सीबीआय,आयबी या वींग तर त्याच आहेत.ते सतत काम करतात.असेही नाही, काही काळ काम करतात आणि काही काळ झोपा काढतात.दाभोळकर,पानसरे,कलबु्र्गी,गौरी लंकेश यांचा खून झाला.बातमी फक्त खुनाचीच आली.धमकीची नाही.जर यांचे कार्य कोणाला खटकत होते तर तशा इशारा दिला असता.त्यांना अडवले असते.त्यांना नामोहरम केले असते.तरीही ते थांबत नसतील तर,जिवे मारण्याची धमकी दिली असती.पण तसे काहीही, कुठेही ऐकण्यात , वाचण्यात, पाहाण्यात आले नाही.जे ऐकले,वाचले ते फक्त खूनच.
“माय ऑब्जेक्शन इज हेअर.”
“यस कम टू द पॉईंट.”
यस सर.मागील दहा वर्षात ज्यांना ज्यांना खुनाची धमकी आली पैकी एकाचाही खून झाला नाही.किंवा साधी मारहाण सुद्धा झाली नाही.ते सराईतपणे मुक्तपणे फिरत आहेत,बोलत आहेत. कसलीही भीती दिसत नाही.त्यांची तब्येत सुधारली. चेहऱ्यावर भय नाही,रोनक वाढली.आणि ते सर्व भाजपचे पदाधिकारी आहेत.
वुई केम टू द पॉईंट सर.धमकी आली.टिव्हीला बातमी आली.अनेकदा.पेपरला बातमी आली.अनेकदा.समाज बिथरला.एकमेकांकडे संशयाच्या नजरेने पाहू लागला.रामाने रहिमकडे जाणे येणे बंद केले.पण खुनाची बातमी कधीच आली नाही. कधीच येणार नाही.खून होणारच नाही.गौडबंगाल वाटते.
युवर हॉनर,खून झाले ते इतरांचेच.म्हणे , फक्त म्हणे,ज्यांनी इस्लाम विरोधात, पैगंबर साहेब विरोधात बोलले त्यांचे समर्थन करणाऱ्यांचे.त्यांनीही धमकी नाही,सुचना नाही.तरीही खून झालेत.जे खून झाले , ते भाजपचे नेते नव्हते, पदाधिकारी नव्हते. फक्त ओढूनताणून कार्यकर्ते म्हटले गेले.मेल्याचे मेले भरलेत.दॅट इज माय ऑब्जेक्शन,सर.इतरांचे खून झाले.पण जे आक्षेपार्ह बोलले त्यांचे नाही झाले.
हाऊ फुलीस दोज पर्सनस?दे आर नॉट किलींग द कल्प्रीटस.दे ऑर किलींग ,हू आर नॉट कल्प्रीटस.इट इज मिरॅकल सर.इट इज द ओन्ली रिडल्स ऑफ टेरीरीझम.” यु प्लीज से क्लीअरली,व्हाट यु वांट टू पॉइंट आऊट.”यस सर.वुई केम टू द पॉईंट दॅट, भाजपच्या नेत्यांना , कार्यकर्त्यांना फक्त खुनाच्या धमक्या येतात.पण खून होत नाहीत.इट इज अ फॅब्रेकेटेड ऐक्ट.टू से ,बीजेपी लिडर हॅज बीन थ्रीटनड.इट इज ए ट्रैटेजी ऑफ पॉलिटिक्स.फॉर द सेक ऑफ रिलीजीयस व्होट पोलराईझेसन.टू वीन द इलेक्शन.स्वताला, स्वताच्या पक्षाला हायलाईट करण्याचा हा फार्स आहे.ही रियालिटी नाही.ही फंटाशी आहे.धीस इज माय ऑब्जेक्शन.एका पक्षाच्या नेत्यांचे बिनाधमकीचे खून होतात.आणि दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना फक्त धमक्या येतात,खून होत नाहीत.” ऑब्जेक्शन सस्टेनड.”