ब्रेकिंगमहाराष्ट्र

श्रीगणेशखिंड येथील हरिनाम सप्ताहाची सांगता….शिवसेना व राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने हजारो भाविकांना महाप्रसाद.

श्रीगणेशखिंड येथील हरिनाम सप्ताहाची सांगता….शिवसेना व राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने हजारो भाविकांना महाप्रसाद.

श्री गणेश खिंड येथील अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता

 

*श्रीरामपूर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील श्रीक्षेत्र गणेशखिंड येथे गणपती उत्सवाच्या दहा दिवस श्री संत जगदगुरु तुकाराम महाराज त्रिशतकौत्तर गाथा पारायण सोहळा व अखंड हरीनाम सप्ताह कार्यक्रम वरद गजानन उत्सव सोहळा म्हणून आनंदी वातावरणात संपन्न झाला. पंचक्रोशीतील बारा गावातील भाविक याप्रसंगी मोठ्या संख्येने उपास्थित होते शेवटच्या दिवशी झालेल्या काल्याच्या किर्तनानंतर शिंदे शिवसेना व राष्ट्रीय श्रीराम संघ यांच्यावतीने हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला.*

 

             तालुक्यातील व तालुक्याबाहेरील असंख्य श्रीगणेश भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र गणेशखिंड येथे वर्षभर धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न होत असतात.श्रीगणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थी या दहा दिवस त्याठिकाणी तालुक्यातील व बाहेरील भाविकांची मांदियाळी असते.यावर्षी श्री गणेश देवस्थान ट्रस्ट गणेशखिंड परिसर व समस्थ ग्रामस्थ व भजनी मंडळ यांच्या विशेष प्रयत्नातून सलग दहा दिवस वरद गजानन उत्सव सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.ह.भ.प.प.पु गुरुवर्य शांतीब्रह्म महंत भास्करगिरीजी महाराज श्रीक्षेत्र देवगड संस्थान यांच्या कृपाशीर्वादाने व ह.भ.प.प.पु महंत स्वामी प्रकाशनंदगिरीजी महाराज श्रीक्षेत्र देवगड संस्थान यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात श्रीगणेश चतुर्थीच्या पावन दिवशी महापूजेने व अखंड ज्योत प्रज्वलनाने झाली. 

 

        ध्वजारोहण कार्यक्रम गणेश यात्रा असंख्य भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला दररोज सकाळी व सायंकाळी महाआरतीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.पहिल्या दिवसापासून ते अखेरच्या दिवसापर्यंत दररोज दुपारी एक तास प्रवचन त्यानंतर दोन तास किर्तन तर सायंकाळी एक तास हरिपाठ हे धार्मिक कार्यक्रम होत होते. शेवटच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्थीच्या दिवशी सकाळी ह.भ.प.पु महंत स्वामी प्रकाशनंदगिरीजी महाराज श्रीक्षेत्र देवगड संस्थान यांच्या काल्याच्या किर्तनाने या धार्मिक कार्यक्रमाची सांगता झाली.त्यांनतर शिंदे शिवसेना व राष्ट्रीय श्रीराम संघ यांच्या वतीने उपस्थित हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला.याप्रसंगी शिवसेना नेते व राष्ट्रीय श्रीराम संघांचे अध्यक्ष सागर बेग यांचा सत्कार श्री गणेश देवस्थान ट्रस्ट यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष आकाश बेग व टाकळीभान येथील राष्ट्रीय श्रीराम संघांचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे