प्राइड एकेडमीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकून प्रोत्साहन देण्याचे कौतुकास्पद काम केले — डॉ. निलेश गंगवाल
प्राइड एकेडमीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकून प्रोत्साहन देण्याचे कौतुकास्पद काम केले — डॉ. निलेश गंगवाल
टाकळीभान येथे: प्राइड एकेडमी चे गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप टाकून प्रोत्साहन देण्याचे कौतुकास्पद काम केले आहे असे डॉ. निलेश गंगवाल म्हणाले. प्राइड एकेडमी टाकळीभानच्या वतीने नुकत्याच 10 वी व 12 वी परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते. डॉ. गंगवाल म्हणाले की आमच्या पालकांनी आमचे उच्च शिक्षण केले त्यामुळे आम्ही आज आमच्या पायावर भक्कमपणे उभे राहू शकलो आपणही चांगले शिक्षण घेऊन मोठे व्हावे असे सांगितले व त्यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. वंदनाताई म्हणाल्या की विद्यार्थ्यांनी प्रथम आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. व त्यानुसार आपले प्लॅनिंग, नियोजन केले पाहिजे तरच आपल्याला अपेक्षित क्षेत्रामध्ये यश प्राप्त करणे सोपे होईल. यावेळी प्रा. कार्लस साठे सर यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी पत्रकार दिलीपराव लोखंडे,श्री बंडोपंत बोडखे, आबासाहेब घोगरे सर आदींसह गुणवंत विद्यार्थी, पालक, शाळेचा स्टाफ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अर्जुन राऊत यांनी केले तर आभार प्राचार्य सुरेश कोकणे सर यांनी मानले. या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी ग्रामीण माध्यमिक विद्यालय इयत्ता १०वी प्रथम क्रमांक कु. प्रतिक्षा प्रवीण रणनवरे ८८%, द्वितीय अभय नितीन जाधव ८७.६०%, कु. निकिता अजित पठारे ८७.४०%, इंग्लिश स्कूल इयत्ता १० च्या विद्यार्थ्यांमध्ये कु. पूजा राजेंद्र शेजाळ ९०.२०%, कु. संस्कृती अनिल पटारे, या दोघींना सारखे गुण प्राप्त झाल्याने प्रथम आल्या, तर द्वितीय कु. साक्षी काकासाहेब पारखे९०%, दुतिय क्रमांक कु. सायली संभाजी आघाडे ८९.८०, कु.साक्षी बाबासाहेब जाधव ८९.८० सारखे गुण प्राप्त करून तृतीया आल्या. साक्षी शरद लोखंडे चौथा क्रमांकाने आल्या त्याचप्रमाणे अण्णासाहेब पटारे पा. कनिष्ठ महाविद्यालय वाणिज्य विभाग प्रथम क्रमांक कु. वैभवी हंसराज कांबळे ७८.८३, कु. वृषाली बंडू बहिरट ७८.८३ सारख्या गुण प्राप्त करून प्रथम आल्या, तर द्वितीय कु. ईशा सुनील खंडागळे ७७.८१, तृतीय कु. वैष्णवी ज्ञानेश्वर थोरात 76.20, तर कला शाखेमध्ये प्रथम क्रमांक कु. गौरी अण्णासाहेब तनपुरे ही विद्यार्थिनी 77% गुण मिळवून प्रथम आली. तसेच पत्रकार दिलीपराव लोखंडे यांची कन्या कु. नेहा दिलीप लोखंडे सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय राहुरी कृषी विद्यापीठ येथे १२ परीक्षेत तृतीय आली त्याबद्दल तिचाही सन्मान यावेळी करण्यात आला.