गुन्हेगारी

शनि शिंगणापूर गावच्या माजी सरपंचावर हल्ला  आरोपीं पोलिसांच्या ताब्यात

शनि शिंगणापूर गावच्या माजी सरपंचावर हल्ला 

आरोपीं पोलिसांच्या ताब्यात

 

सोनई,नेवासा तालुक्यातील श्री शेत्र शनिशिंगणापूर येथील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या जबाबदार माजी सरपंच शिवाजी यशवंत शेटे रा. शनिशिंगणापूर यांचेवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे ही घटना राजकीय द्वेषायातून कि अन्य कारणावरून या चर्चेला उधाण आले आहे.या बाबत पोलीस सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार .दि. ११ रोजी रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांचे शनिशिंगणापूर येथे हॉटेल व परमिट रूम बियर बार आहे .फिर्यादी हे हॉटेलचे काउंटरवर असताना यातील आरोपी यश उर्फ भिंगऱ्या जालिंदर भिंगारदिवे , सनी उर्फ मध्या किसन शिंदे, सचिन पवार, अशोक फुलमाळी, लकी विजय चंदीले, सर्व राहणार सोनई यांनी गैर कायद्याची मंडळी जमवून फिर्यादीचे अंगावर अचानक चालून आले व त्यातील एका जणांनी काहीतरी धारदार वस्तूने डोक्यात मारले.त्यात त्यांना डोक्यात मार लागल्याने ते जखमी झाले होते. तसेच हॉटेलमध्ये जमा झालेले बावीस ते तेवीस हजार रुपये रोख रक्कम घेऊन गेले असल्याचे दाखल फिर्यादी मध्ये म्हटले आहे.नुसार गुन्हा र. नं. ११६/२०२५ बिएनएस चे. कलम १९१(२),१८९(२),११८(२),११९(१),११५(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असुन सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना त्यातील आरोपी नामे यश ऊर्फ भिंगऱ्या जालिंदर भिंगारदिवे, वय-२१ वर्ष, राहणार – बेलेकर वाडी रोड, ,सनी ऊर्फ मध्या किसन शिंदे, वय-२१ वर्ष, राहणार -हलवाई गल्ली, आंबेडकर चौक, सोनई, यांना गुन्ह्या घडल्या पासून चौवीस तासाचे आत ताब्यात घेवून अटक करण्यात आली . सदर कारवाई शनिशिंगणापूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक. आशिष शेळके , सहाय्यक फौजदार नितीन सप्तर्षी, सहाय्यक फौजदार ज्ञानेश्वर माळवे, पोहेकाँ रमेश लबडे, चा.पो.काँ. संतोष मुरकुटे, मारुती पवार,पोकाँ अमोल पोंधे, पोकाँ अजय ठुबे, महिला पोलीस कॉन्स्टेबल वृषाली गर्जे यांनी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरचे पोहेकॉ ज्ञानेश्वर शिंदे, पोहेकॉ गणेश भिंगारदिवे, पोना अशोक लिपने, पो कॉ भगवान थोरात, पो कॉ रोहित येमुल, पो का. किशोर शिरसाठ* यांच्या मदतीने सदरची कारवाई केली आहे.

सदरची कारवाई ही . राकेश ओला , पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,. वैभव कलुबर्मे , अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव,स्थानिक गुन्हे शाखेचे.वरीष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश आहेर , यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. आशिष शेळके, सहाय्यक फौजदार सप्तर्षी यांनी केली असून अटकेतील आरोपीतांना मा. न्यायालयाने दि. १७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. इतर आरोपींचा देखील शोध सुरू असल्याचे शेळके यांनी सांगितले. पुढील तपास सहाय्यक फौजदार नितीन सप्तर्षी हे करत आहेत.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे