*हिटरची टाकी फुटून उकळते पाणी अंगावर पडलेल्या महिलेचा मृत्य*.
दिंद्रुड पाण्याचे हिटर सुरू करून झोपलेली महिला टाकी फुटल्याने उकळते पाणी अंगाखाली येऊन गंभीर जखमी झाली. उपचारादरम्यान रविवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. ही घटना दिंद्रुड जवळ येईल पिंपळगाव ना. येथे घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की 19 सप्टेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास उषा रंजीत सुरवसे ही 31 वर्षीय महिला हिटर लावून झोपली. रात्री तीन वाजेच्या सुमारास पाण्याला उकळी येऊन प्लास्टिकची टाकी फुटली. टाकी फुटल्यामुळे जवळच झोपलेल्या उषा सुरवसे यांच्या अंगाखाली उकळते पाणी आले या दुर्घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या. जखमी उषाबाईंना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान उपचार सुरू असताना रविवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.त्यांच्या पश्चात पती , तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे