खंडकऱ्यांच्या वर्ग २ च्या जमीनीबाबत निर्णय घेवु महसुल मंत्री नामदार विखे पा .
खंडकऱ्यांच्या वर्ग २ च्या जमीनीबाबत निर्णय घेवु महसुल मंत्री नामदार विखे पा .
–खंडकरी शेतक-याना वाटप केलेल्या वर्ग दोन धारणेच्या जमिनी वर्ग एक धारणेच्या करणेबाबत लवकरच बैठक घेवून सदरचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन राज्याचे महसूल मंञी ना.राधाकृष्ण विखे यांनी दिले. श्रीरामपूर तालुक्यातील खंडकरी शेतकं-यांच्या वतीने खंडक-यांचे ज्येष्ठ नेते काॕ.अण्णा पा.थोरात, जमिन वाटप समितीचे सदस्य सुधाकर खंडागळे ,ञ्यंबकराव कु-हे,शिवाजी पा.वाबळे आदिंनी ना.विखे यांना निवेदन दिले.त्या निवेदनात पुढे म्हटले आहे की खंडक-यांना सन १९७१,१९७८,२०१२व२०२२मध्ये जमिनी परत देण्यात आल्या.सदर जमिनी वर्ग १धारणेच्या देण्यात येतील असे मार्गदर्शक तत्व ठरलेले असताना प्रत्यक्षात त्या वर्ग २ धारणेच्या देण्यात आल्या.यामुळे खंडक-यांना कर्ज मिळविण्यात अडचणी येतात.सबब सदरच्या जमिनी वर्ग १च्या करुन देण्यात याव्यात अशी मागणी खंडकऱ्यांच्या वतीने करण्यात आली. —-यावर ना.विखे यांनी याबाबत खंडक-यांची लवकरच बैठक घेवू.तसेच हा प्रश्न शासन दरबारी मांडून तो मार्गी लावण्याचा प्रयत्न करु असे आश्वासन खंडकरी प्रतिनिधींना दिले.यावेळी बाळासाहेब नेहे,दत्ता साळुंके,गंगाधर चौधरी,अॕड.काजळे,बाळासाहेब थोरात,श्याम चव्हाण,कांदळकर आदि उपस्थित होते.