पोलिस यांची कर्तबगारी..नेपाळ च्या चोरांना दरोड्याच्या तयारीत असताना ठोकल्या बेड्या*
*आळंदी पोलिस यांची कर्तबगारी..नेपाळ च्या चोरांना दरोड्याच्या तयारीत असताना ठोकल्या बेड्या*
आंतरराष्ट्रीय टोळीतील दरोडा टाकण्याच्या पूर्ण तयारीने आलेल्या सहा ते सात जणांच्या टोळक्याला तोंडाला रुमाल बांधलेल्या अवस्थेमध्ये आळंदी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दरोडा टाकणारी ही आंतरराष्ट्रीय टोळी असल्याचे समजते. सुमारे सहा लाख सत्तावीस हजार 875 रुपयाचा मुद्देमाल या चोरट्यांकडून आळंदी पोलिसांनी जप्त केला आहे. या सात जणांविरुद्ध आळंदी पोलिसांनी आळंदी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. नयसिंग उर्फ नेनेशी लालसिंग धोली (वय.45) नीट बहन सिंग धमाई उर्फ मृत बुवांची धमाई (वय 32) विशाल शेटे उर्फ शेरे ढोली (वय 18) दिनेश नर्सिंग उर्फ नेनिशी ढोली (वय 19) नेमकी खडकी लक्ष्मण राजू दमाई (वय 21) सध्या सर्व राहणार लोणी काळभोर तालुका हवेली जिल्हा पुणे मुळगाव लमकी ता. चुहा ,नेपाळ आणि एक अल्पवयीन बालक अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर नेपाळची आंतरराष्ट्रीय टोळी चींबळी केळगाव रस्त्यावरील कंपनीत दरोडा टाकण्याचे तयारी येत असल्याची खबर मिळाली. आळंदी पोलिसांनी सापळा रचुन या टोळीला मोठ्या शिताफीने अटक केली.मात्र त्यापैकी एक जण पळून जाण्यास यशस्वी झाला.मात्र निगडी येथे पोलिसांनी त्याच्या दुसऱ्या दिवशी मुस्क्या आवळल्या अंधाराचा फायदा घेऊन सदर टोळी पळ काढण्याच्या तयारीत होती. पोलिसांनी चारी बाजूने घेरून जीवाची बाजी लावत यांना अटक केल्याने सर्व स्तरात आळंदीत त्यांचे कौतुक केले जात आहे. सदर कारवाई मध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे. अप्पर आयुक्त डॉ. संजय शिंदे. उपायुक्त परिमंडल एक मंचक ईप्पर सहाय्यक आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदीत नव्याने रुजू झालेले वरिष्ठ निरीक्षक सुनील गोडसे निरीक्षक गुन्हे रमेश पाटील. तपास पथकाचे उपनिरीक्षक बी एम जोंधळे. राजाराम लोणकर. बाजीराव सानप.नितीन साळुंखे,बाळासाहेब खेडकर, कैलास गरजे, गजानन आडे, विकास पालवे, सचिन बांगर, यांनी सदर कारवाई जिगर लावली आहे. पुढील तपास आळंदीच्या उपनिरीक्षक विद्या कदम करत .आहेत सदर आरोपी सराईत असून त्यांच्यावर याआधी आळंदी पोलीस ठाण्यामध्ये चार आणि चाकण पोलीस ठाण्यामध्ये एक असे पाच गुन्हे उघडकीस आणण्यात आळंदी पोलिसांना यश आले