पिण्याच्या पाण्यात निघाले कावळा सडलेले मासाचे तुकडे
पिण्याच्या पाण्यात निघाले कावळा सडलेले मासाचे तुकडे
टाकळीभान येथे येथील प्रभाग क्रमांक पाच मध्ये ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन मधून मटणाचे तुकडे सडलेल्या अवस्थेतील कावळे व पंख निघाल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
प्रभाग क्रमांक पाचमध्ये हरिजन, मातंग व आदिवासी समाजातील मोठी संख्या असलेल्या ग्रामस्थांना पाणीपुरवठा करणारी टाकी बाजार तळात आहे. बाजारतळाजवळच असलेल्या चिकन, मटन शॉपचे दुकाने आहेत. तेथील आतडे कातडेची घाण कावळे उचलून आणून टाकीवर येऊन बसतात. टाकीला झाकण नसल्यामुळे कावळ्यासह घाण पाण्यात पडत आहे. तोच पाणीपुरवठा ग्रामस्थांना पिण्यासाठी होतो. घाणीने पाईपलाईन कोंडल्यामुळे पाणीपुरवठा बंद झाला. त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने पाईपलाईन चेक केली तर पुन्हा पाण्याच्या प्रवाहात सडलेल्या अवस्थेत मृतकावळे, पंख आणि मटणाचे तुकडे निघाले आहे. हा प्रकार गेल्या सहा महिन्यात दोनदा झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.
ʻʻटाकीला झाकण नाही बरोबर आहे. मात्र दोन दिवसात टाकीला झाकण बसविण्यात येईल. झालेला प्रकार अपघात आहे. यापुढे ग्रामस्थांना स्वच्छ पाणीपुरवठ्याची काळजी घेऊ –
रामदास जाधव, ग्रामविकास अधिकारी