ब्रेकिंगमहाराष्ट्र
विहिरीत पडलेले बिबट्याचे पिल्लू वाचवले

विहिरीत पडलेले बिबट्याचे पिल्लू वाचवले
श्रीरामपूर तालुक्यातील भामाठान शिवारात ज्ञानेश्वर सांगळे यांच्या मालकीच्या गट नं.४७ मधील शेतातील विहीरीत पडलेल्या बिबट्याचे बछड्यांस वनविभाग अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांचे मदतीने बाहेर काढून जिवदान दिले.
माळवाडगांव , खानापूर,भामाठान शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातलेला असून माळवाडगांव येथे पिंजरा लावलेला असताना भामाठान शिवारात सांगळे यांच्या विहीरीत बिबट्याचे बछडे पाण्यात कठड्यावर बसलेले आढळून आल्याने कोपरगांव वनविभाग कार्यालयास खबर देण्यात आली. एक सहाय्यक अधिकारी व एक कर्मचारी दाखल झाल्यावर शेतकऱ्यांचे मदतीने बाहेर काढले.परिसरात जवळच बछड्याची मादी प्रतिक्षेत असणार म्हणून त्या बछड्यांस सोडून देण्यात आले.