राजकिय

*शरद पवारांसह मान्यवरांच्या उपस्थितीत माजीमंत्री शिवाजीराव पंडित यांचा ८५ वा अभिष्टचिंतन सोहळा*

*शरद पवारांसह मान्यवरांच्या उपस्थितीत माजीमंत्री शिवाजीराव पंडित यांचा ८५ वा अभिष्टचिंतन सोहळा*

 

*रामकथा व किर्तन महोत्सवासह विविध कार्यक्रमांचे गेवराईत आयोजन*

 

 माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त गेवराई येथे भव्य अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पद्मविभूषण खा.शरद पवार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी राज्यपाल खा.श्रीनिवास पाटील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, रोहयो मंत्री संदिपानराव भुमरे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने गेवराई शहरात रामकथा ज्ञानयज्ञ व किर्तन महोत्सवासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अभिष्टचिंतन सोहळा समितीच्यावतीने देण्यात आली.

 

 गेवराई विधानसभा मतदार संघाच्या विकासाचे शिल्पकार माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अभिष्टचिंतन सोहळा समितीच्या माध्यमातून दि.६ ते १३ ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. रामायणाचार्य ह.भ.प.रामराव महाराज ढोक यांचा संगीत रामकथा ज्ञानयज्ञ, महाराष्ट्रातील ख्यातनाम किर्तनकारांच्या उपस्थितीत भव्य किर्तन महोत्सव, इंडियन आयडॉल फेम गायकांच्या भजनसंध्या, सोंगी भारुड, पोवाडे आदींचा यामध्ये समावेश आहे. मुख्य अभिष्टचिंतन सोहळा रविवार, दि.९ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० वा. शिवनगरी, र.भ.अट्टल महाविद्यालय, गेवराई येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात शिवाजीराव दादांचा मुख्य सत्कार पद्मविभूषण खा.शरद पवार यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.

 

 मुख्य अभिष्टचिंतन सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून सिक्कीमचे माजी राज्यपाल खा.श्रीनिवास पाटील उपस्थित राहणार असून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, रोहयो मंत्री संदिपानराव भुमरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, राज्यसभा सदस्या खा.रजनीताई पाटील, माजीमंत्री आ.दिलीप वळसे पाटील, माजीमंत्री आ.धनंजय मुंडे, आ.राजेश टोपे, आ.प्रकाशदादा सोळंके, आ.सुरेश धस, माजीमंत्री दिलीपराव देशमुख, आ.डॉ.राहुल पाटील, आ.सतिष चव्हाण, आ.संदिप क्षीरसागर, आ.बाळासाहेब आजबे, आ.विक्रम काळे, आ.नमीता मुंदडा, माजी आ.राजन पाटील, माजी आ.विलासराव खरात यांच्यासह बीड जिल्ह्यातील माजी आमदारांसह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

 

 या कार्यक्रमात श्री क्षेत्र नारायणगड संस्थानचे महंत शिवाजी महाराज, भगवानगडचे डॉ.नामदेव शास्त्री, अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले, गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज, श्री क्षेत्र चाकरवाडीचे महादेव महाराज, बंकटस्वामी संस्थानचे लक्ष्मण महाराज मेंगडे, गोरक्षनाथ टेकडीचे नवनाथ महाराज, मत्स्येंद्रनाथगडाचे जगन्नाथ महाराज गुरु निगमानंद, पाटोदा येथील रामकृष्ण रंधवेबापू आणि तालमहर्षी उध्दवबापू आपेगावकर यांची याप्रसंगी आशिर्वादपर उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाला गेवराई तालुक्यातील साधू, संत-महंत उपस्थित राहणार आहेत. अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या किर्तन महोत्सवात ह.भ.प.आचार्य अमृताश्रम स्वामी, ह.भ.प.आत्मविद्या विशारद हरिहर दिवेगावकर, ह.भ.प.विद्याविनोद वैभव केशव उखळीकर, ह.भ.प.भागवताचार्य बाळू महाराज गिरगावकर, ह.भ.प.रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर, ह.भ.प.सय्यद जलाल महाराज, ह.भ.प.उमेश महाराज दशरथे यांच्या सुश्राव्य किर्तनासह काल्याचे किर्तन श्री क्षेत्र नारायणगडचे मठाधिपती ह.भ.प.शिवाजी महाराज हे करणार आहेत. सात दिवस ह.भ.प. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या संगीत रामकथेचे आयोजनही करण्यात येणार आहे.

 

 सारेगमप व इंडियन आयडॉल फेम अंजली व नंदिनी गायकवाड, संगीत अलंकार शंकर गिरी व प्रकाश कातखडे, किशोर दिवटे व निवृत्ती लकडे, नारायण खिल्लारी व महेश भगुरे, भजन सम्राट आदिनाथ सटले व तुळशीराम आतकरे यांच्या भजनसंध्या, भारुड भूषण विष्णू महाराज बांडे व प्रभाकर कुटे यांचे सोंगी भारुड आणि शिवशाहीर कल्याण काळे यांच्या पोवाड्याच्या कार्यक्रमाचे आयोजनही किर्तन महोत्सवात करण्यात आले आहे. गेवराई विधानसभा मतदार संघातील शिवाजीराव दादा प्रेमी पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अभिष्टचिंतन सोहळा समितीच्या माध्यमातून स्वागताध्यक्ष ॲड.राजेश्वर चव्हाण यांनी सर्वांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे