कुणाला मानसिक ,आर्थिक त्रास देण्याकरीता न्यायालयात येवु नका- न्यायाधीश नांदगावकर
कुणाला मानसिक ,आर्थिक त्रास देण्याकरीता न्यायालयात येवु नका- न्यायाधीश नांदगावकर
आपल्यावर अन्याय झाला असेल तर न्यायालयात जरुर या न्याय निश्चितच मिळेल परंतु कुणाला जाणुन बुजुन मानसिक, आर्थिक त्रास देण्याच्या उद्देशाने न्यायालयात खटला दाखल करु नका असे उद़्गार जिल्हा न्यायाधीश अभिजीत नांदगावकर यांनी काढले भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव व बेलापुर ग्रामपंचायतीचा शतक महोत्सव याचे औचित्य साधुन तालुका विधी सेवा समीती श्रीरामपुर व वकील संघ श्रीरामपुर यांच्या संयुक्त विद्यमाने नागरीकांची कायदे विषयक जनजागृती या विषयावर आयोजित समाज प्रबोधन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते या वेळी व्ही बी कांबळे सह दिवाणी न्यायाधीश न्यायाधीश एन के खराडे २ रे सह दिवाणी न्यायाधीश श्रीरामपुर न्यायाधीश श्रीमती पी ए पटेल ४ थे सह दिवाणी न्यायाधीश मा जि प सदस्य शरद नवले प्रमुख अतिथी उपस्थित होते जिल्हा न्यायाधीश अभिजीत नांदगावकर पुढे म्हणाले की आपल्या अधिकारा करीता आपण भांडत असतो त्याच वेळी आपल्याला आपल्या जबाबदारीचीही जाणीव असली पाहीजे एखादे कृत्य दुसऱ्याने करु नये असे वाटते तो कायदा त्यामुळे आपण आपल्या बुध्दीला पटेल अशा कायद्याचे पालन करा असेही ते म्हणाले २ रे सह दिवाणी न्यायाधीश एन के खराडे म्हणाले की जमीनी बाबत सर्वात जास्त वाद न्यायालयात येत असतात वारस हक्काने मिळणाऱ्या संपत्तीत आता मुला बरोबरीने मुलीचाही हिस्सा आहे परंतु मुलीच्या लग्नाकरीता कर्ज घेतले असेल तर ती ही जबाबदारी स्विकारणे आपले कर्तव्य आहे हे कायद्यानेच बंधन घालुन दिले आहे अँड मनिषा वर्मा यांनी महीला विषयक कायदे व त्याची सविस्तर माहीती दिली अन कायद्याने दिलेल्या अधिकाराचा दुरुपयोग करु नका असेही त्या म्हणाल्या अँड विजयराव साळूंके यांनी आपापसात झालेले वाद मिटविण्यासाठी मध्यस्थाची भुमीका महत्वाची असुन समाजातील जेष्ठ नागरीकांनी पुढाकार घेवुन वाद कसे मिटविले जातील या करीति प्रयत्न करावे असेही ते म्हणाले या वेळी ४ थे सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती पी ए पटेल यांनीही संपत्ती बाबतचे अधिकार या बाबत माहीती दिली या वेळी वकील संघाचे अध्यक्ष अँड व्ही एच शेळके वकील संघाचे खजिनदार अँड जिवन पांडे अँड सुनिल शेळके अँड जगन्नाथ राठी सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे अँड एन जी खंडागळे अँड एस आर बिहाणी अँड एम डी आढाव पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा किशोर काळे बाबुलाल शेख सुभाष राशिनकर शफीक बागवान ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे हवालदार अतुल लोटके गणेश भिंगारदे उपेंद्र कुलकर्णी आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते प्रास्ताविक अँड सुनिल शेळके यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पत्रकार देविदास देसाई यांनी केले तर शरद नवले यांनी आभार मानले