जय भीम,जय श्रीराम चे नारे देणे आणि निळ्या झेंड्याबरोबर भगवा झेंडा फडकवणे गुन्हा ठरत असेल तर हिंदूंची होत असलेली अशी मुस्कटदाबी कदापिही सहन करणार नसल्याचा गंभीर इशारा राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेग
जय भीम,जय श्रीराम चे नारे देणे आणि निळ्या झेंड्याबरोबर भगवा झेंडा फडकवणे गुन्हा ठरत असेल तर हिंदूंची होत असलेली अशी मुस्कटदाबी कदापिही सहन करणार नसल्याचा गंभीर इशारा राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेग यांनी दिला आहे.*
श्रीरामपूर शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढलेल्या भव्य मिरवणुकीत काही आंबेडकरी हिंदुत्ववादी बांधवांनी निळ्या झेंड्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा घेऊन सहभाग घेतला व त्यावेळी जय श्रीराम, जय भीम,जय शिवरायांच्या घोषणा दिल्या.सर्व काही शांततेत आणि सामाजिक सलोखा ठेवून चालू असतांना श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पो.नि. हर्षवर्धन गवळी यांनी मोठ्या पोलीस फौज फाट्यासह त्याठिकाणी येऊन भगवा व निळ्या झेंडा घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतलेल्या दहा ते बारा युवकांना बेदम मार दिला व त्यांच्यां हातातील झेंडे ओढून फेकून देऊन झेंड्यांचा अपमान केला व दहा ते बारा युवकांना ताब्यात घेतले.
त्याठिकाणी राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी येऊन शांततेत चाललेल्या मिरवणुकीत युवकांवर लाठीमार व भगवा व निळ्या रंगांच्या पवित्र झेंड्यांचा अपमान का केला म्हणून पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना जाब विचारला.परंतू शांततेत सुरू असलेली मिरवणुकीत बाधा आणलेल्या पोलिसांनी कायद्याची भाषा करत उलट सुलट उत्तरे दिली.तेंव्हा त्याठिकाणी राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग व पोलीस निरीक्षक गवळी यांच्यात काहीकाळ खडाजंगी झाली.शहर पोलीस ठाण्याबाहेर सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते जमा झाल्यानंतरही शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक समाधान सुरवडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रेमी रामभक्त मयूर चंदन यास पोलीस ठाण्याच्या आवारात बेदम मारहाण केली व त्याच्या गळ्यात असलेली भगवी शाल काढून फेकून देऊन त्यांनी भगव्याचा घोर अपमान केला.
पोलिसांच्या या चुकीच्या करवाईबद्दल बोलतांना सागर बेग म्हणाले की,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान आहेत त्यांची जयंती हा श्रीरामपुर शहरात एक आनंदोत्सव म्हणून सर्वधर्मीय समाज बांधव साजरा करत असतात ही परंपरा अनेक वर्षांपासून चालू असतांना यावर्षी पोलिसांनी भगव्या व निळ्या झेंडा घेऊन आनंदाने नाचणाऱ्या युवकांवर जो लाठीहल्ला केला आहे त्याचा जाहीर निषेध सर्व स्तरातून झाला पाहिजे. हिंदुत्ववादी शासन म्हणून ज्या सरकारकडे आज बघितले जात आहे त्याच सरकारच्या कार्यकाळात जर भगव्या व निळ्या झेंड्यांची पोलिसांना ऍलर्जी असेल आणि या पवित्र झेंड्यांचा असा अपमान होत असेल तर राष्ट्रीय श्रीराम संघ संविधानाच्या मार्गाने आवाज उठवेल असा इशारा सागर बेग यांनी दिला आहे.पोलिसांच्या या चुकीच्या कारवाईचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे तर राष्ट्रीय श्रीराम संघ यांनी पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस उप निरीक्षक समाधान सुरवडे यांनी मयूर चंदन या युवकास कोणताही गंभीर गुन्हा नसतांना केलेल्या मारहाणीचा निषेध करत त्यांच्यावर कारवाईची मागणीचे निवेदन दिले.पोलिसांनी हकनाक डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रेमी रामभक्ताला केलेल्या अमानुष मारहाणीचा सीसीटीव्ही फुटेज शहर पोलिसांनी तात्काळ जतन करून पोलीस उप निरीक्षक समाधान सुरवडे यांच्यावर कठोर कारवाई करावी असे निवेदनात म्हंटले आहे.