गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

क्षमतेपेक्षा जास्त ध्वनि प्रदूषण केल्यास गुन्हे दाखल होतील – स्वप्निल राठोड*

*क्षमतेपेक्षा जास्त ध्वनि प्रदूषण केल्यास गुन्हे दाखल होतील – स्वप्निल राठोड*

 

गणेश उत्सव मोठ्या थाटात साजरे करण्यात येत असताना गणेश भक्तांनी गणेश विसर्जनच्या दिवशी डीजे सारख्या कर्कस आवाजाने ध्वनी प्रदूषण व नागरिक ना त्रास होईल असे प्रकारचे वाद्य वाजून प्रदूषण करू नये ध्वनी प्रदूषण केल्यास संबंधित वाद्य वाजवणारे व गणेश मंडळावर गुन्हे दाखल करण्यात येतील असे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड यांनी आव्हान केले आहे व तसे गणेश भक्ताला नोटीसीद्वारे कळवले आहे .

   सन उत्सव साजरे करण्यात येत असताना शासनाकडून धोनी वाजवण्यासाठी काही नियम अटी दिलेल्या असून त्या अटीच्या आधीन राहून गणेश भक्त व दोन्ही वाजवणारे यंत्रणेने शासनाच्या नियमाचे अधीन राहून दोन्ही प्रदूषण करावे नसता ध्वनीप्रदुषन ( विनियमन व नियंत्रण ) अधिनीयम 2000 कलम 8 प्रमाणे नोटीस ज्याअर्थी , व ध्वनीप्रदुषन ( विनियमन व नियंत्रण ) अधिनीयम -2000 कलम 8 प्रमाणे , अधिकारानुसार नमुद कायदयातील तरतुदी प्रमाणे ध्वनी प्रदुषन निर्माण करणारे साधनांचे विनियमन व नियंत्रण करणे आवश्यक आहे . त्यामुळे गणेशोत्सव व मिरवणुकीमध्ये वाद्य व लाऊडस्पिकर सिस्टीम इत्यादींचा वापर होणार असुन , मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदुषण होवुन ध्वनीप्रदुषणामुळे सर्व सामान्य नागरीकांना , वृध्दांना , रूग्णांना , बालकांना , मानसिक व शारिरीक त्रास होवुन सामाजिक स्वस्थ्यास हाणी होवुन शकते तसेच अतिउच्च ध्वनी कंपनामुळे अपघात होवु शकतो त्यामुळे

 मा . सर्वोच्च न्यायालय यांचे निर्देशानुसार , तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम सन 1986 सह ध्वनीप्रदुषण विनियमन व नियंत्रण नियमावली 2000 चे अन्वये ध्वनीक्षेपक / लाऊडस्पिकर , संगीत वाद्य व इतर वाद्यांचा वापर शासनाने विशेष वेळी एका कॅलेंडर वर्षात 15 दिवस रात्री 22.00 वा . ते 24.00 वा . पावेतो दिलेली सवलत खेरीज करून इतर दिवशी दररोज सकाळी 06.00 वा . ते 22.00 वा . पावेतो करता येईल . तसेच या कायद्यान्वये ध्वनीक्षेपक / लाऊडस्पिकर , वाद्यांचा वापर हा शांतता क्षेत्र वगळून इतर ठिकाणी खालील नमुद क्षेत्रानुसार खालील डेसीबल मर्यादेपेक्षा जास्त ठेवण्यात येवु नये , क्षेत्र कोड क्षेत्र अ ब क ल औद्योगिक क्षेत्र व्यापारी क्षेत्र निवासी क्षेत्र शांतता क्षेत्र दिवसा ( 06.00 ते 22.00 वा . ) 75 डी.बी. ( अ ) एलईक्यु 65 डी.बी. ( अ ) एलईक्यु 55 डी.बी. ( अ ) एलईक्यु 50 डी.बी. ( अ ) एलईक्यु रात्री ( 22.00 ते 24.00 वा . ) 70 डी.बी. ( अ ) एलईक्यु 55 डी.बी. ( अ ) एलईक्यु 45 डी.बी. ( अ ) एलईक्यु 40 डी.बी. ( अ ) एलईक्यु प्रमाणे आवाजाचा वापर करावा.

   उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड यांनी आव्हान केले आहे व नोटीसीद्वारे गणेश भक्त मंडळ डीजे वादक यंत्रणा यांनी सणा दिवशी वापरण्यात आलेले ध्वनीक्षेपक / लाऊडस्पिकर , संगीत वाद्य इत्यादीचा पर्यावरण ( संरक्षण ) कायदा सन 1986 सह ध्वनीप्रदुषन ( विनियमन व नियंत्रण ) अधिनीयम -2000 चे अन्वये ठरवुन दिलेल्या डेसिबल क्षमतेपेक्षा जास्त वापर किंवा त्याच्या ठराविक मर्यादेची आवाजाची पातळी ओलांडु नये . अन्यथा सदर आदेशाचे भंग केल्याबाबत पर्यावरण ( संरक्षण ) कायदा सन 1986 सह ध्वनीप्रदुषन ( विनियमन व नियंत्रण ) नियमावली 2000 चे कलम 15 अन्वये आपल्या विरूध्द गुन्हा दाखल होवुन आपण वापरलेले वाद्य व लाऊडस्पिकर सामुग्री जप्त करण्यात येईल. असे पोलीस विभागातून कळवण्यात आलेले असून गणेश भक्त व संगीत वाद्य यंत्रणा यांनी माननीय न्यायालयाचे आदीन राऊत कसल्याही प्रकारच्या नागरिक न त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी अशी आव्हान उपविभागीय अधिकारी स्वप्निल राठोड यांनी केले

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे