ब्रेकिंग
प्रेमासाठी काही पण” बँकेचे सोने आणि रोकड घेऊन प्रेयकराबरोबर तरूणी पळाली
प्रेमासाठी काही पण” बँकेचे सोने आणि रोकड घेऊन प्रेयकराबरोबर तरूणी पळाली
- आईने पोलिसात मुलगी गायब असल्याची केली तक्रार दाखल
- पाथर्डी – प्रेमासाठी काही पण म्हणत अनेक जोडपी सैराट होत असतात. माञ सैराट होतांना आपण काय करतो याचे भान त्या प्रेमी युगलांना नसते. अशीच एक घटना अ. नगर जिल्ह्य़ातील पाथर्डी येथे घडली असुन एका खाजगी बँकेत नोकरी करणार्या एका तरूणीने बँकेचे बारा तोळे सोने आणि 38 लाख रूपयांची रक्कम घेऊन पोबारा केला आहे. या घटनेची तक्रार बँकेने न करता तरुणीच्या आईने मुलगी गायब झाल्याची तक्रार पोलिसात दाखल केली आहे.
- स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार शहरातील एका खासगी पतसंस्थेमध्ये वीस वर्षीय असलेली मुलीने बँकेतील रोख रक्कम ३८ लाख चौत्तीस हजार आणि बारा तोळे सोन्याचे दागिने घेऊन आपल्या प्रियकरासोबत पसार झाली आहे. या घटनेमुळे अ. नगर जिल्ह्य़ातील बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. बँकेत असलेला खातेदारांचा पैसा आणि सोने तारण ठेवून ग्राहकांनी त्यावर पैसे घेतले आहे. त्या दागिन्यावर सदर महिला कर्मचाऱ्याचा डोळा होता. योग्य संधी शोधत त्या महिला कर्मचाऱ्याने खातेदारांच्या सोन्याच्या दागिण्यावर आणि रोख रक्कमेवर डल्ला मारून पोबारा केला आहे. या बाबत चोरीचा गुन्हा बँकेच्या अधिकाऱ्याने दाखल करणे अपेक्षित होते. पण तसे न होता तरुणीच्या आईने आपली मुलगी गायब झाली असल्याची तक्रार पोलिसात दाखल केली आहे.