पंजाबराव डख यांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजार आवारात सदिच्छा भेट.*

*पंजाबराव डख यांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजार आवारात सदिच्छा भेट.*
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पावसाबद्दल मोलाचे निःशुल्क मार्गदर्शन करणारे हवामान विषय अभ्यासक खरे शेतकरी मित्र श्री. पंजाबराव डख यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजार आवारास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना ४ जून ते १२ जून मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याचे सांगितले. त्यांनी वर्तविलेल्या अंदाजाबद्दल उपस्थित शेतकऱ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करून आनंद व्यक्त केला.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि टाकळीभान ग्रामस्थांच्या वतीने पंजाबराव डख यांचा सत्कार करून ते करत असलेल्या कार्याबद्दल आभार बाजार समितीचे संचालक मयुर पटारे यांनी मानले.
यावेळी कारखान्याचे माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, बाजार समितीचे संचालक मयुर पटारे, विलास दाभाडे, रावसाहेब वाघुले, सुनील बोडखे, यशवंत रणनवरे, दत्तात्रय पटारे, भाऊसाहेब पटारे, बाळासाहेब आहेर, तुकाराम बोडखे, मोहन रणनवरे, एकनाथ पटारे, सुभाष ब्राम्हणे, बापूसाहेब नवले, सचिव दिनकर पवार, भाऊसाहेब कुशाबा पवार, बबलू वाघुले, बाळासाहेब कोकणे, किशोर बनकर आदी शेतकरी आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.