वांगी बुद्रुक मधील ग्रामपंचायत स्मशान भूमी तसेच जिल्हा परिषद शाळेकडे जाणारा रस्ता बनवला निकृष्ट दर्जेचा

वांगी बुद्रुक मधील ग्रामपंचायत स्मशान भूमी तसेच जिल्हा परिषद शाळेकडे जाणारा रस्ता बनवला निकृष्ट दर्जेचा
श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बुद्रुक मध्ये 14 वा वित्त आयोगातून नुकताच ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेकडे जाणारा भेर्डापूर खिर्डी रस्त्याला जोडला गेलेला सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करण्यात आला परंतु रस्त्याचा कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याकारणाने ग्रामस्थ आक्रमक झाले आहे संबंधित ठेकेदाराने काम निकृष्ट दर्जाचे केले आहे ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा रस्ता निकृष्ट झाल्याचे बोलले जात आहे रस्ता हा मानवी हाताने व पायाने फुटत आहे रस्त्याला वापरलेले मटेरियल खूपच कमी प्रमाणात वापरले गेलेले आहे सिमेंट मध्ये माती मिश्रित प्रकार असल्याचे दिसून येत असल्याकारणाने माजी सरपंच संजय भिसे व धनंजय माने यांनी याबाबत गटविकास अधिकारी पंचायत समिती श्रीरामपूर यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल केले त्यांनी कामाची पाहणी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली परंतु अशा ठेकेदारांना अधिकारी कर्मचारी कशाच्या तरी आमिषाला बळी पडल्याने दिसून येत आहे तक्रार अर्ज दाखल केल्यावर संबंधित अधिकारी ठेकेदाराला घेऊन साइटवर येतात व झालेल्या कामावर फक्त पाणी मारण्याचे सांगतात ही शोकांतिकेची बाब आहे या कामांमध्ये वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालण्याची गरज असल्याचे मत माजी सरपंच संजय भिसे यांनी व्यक्त केले दहा दिवसापूर्वी काम पूर्ण झाले असून साईट पट्ट्या ही व्यवस्थित भरलेल्या नाहीत तसेच रस्त्याच्या कामाची गुणवत्ता खूपच कमी आहे हे कामे अशी झाली तर दरवर्षी परत परत कामे करावी लागतील शासकीय यंत्रणा जाणून-बुजून दुर्लक्ष करत असते ठेकेदारांना पाठीशी घालणाऱ्या कर्मचारी यांच्यावर देखील कारवाई होणे गरजेचे आहे असे मत अखिल भारतीय मानवाधिकार मिशन जिल्हाध्यक्ष धनंजय माने यांनी व्यक्त केले
संबंधित काम इस्टिमेट पद्धतीने झालेले नसून कामांमध्ये कचराही केलेली आहे काम निकृष्ट दर्जाचे असून वरिष्ठांनी कामाची पाहणी करून चौकशी करावी तसेच संबंधित ठेकेदारावर ही कारवाई करावी व ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या वर कर्मचाऱ्यांच्या वर शिस्तभंगाची कारवाई करावी अन्यथा मी जिल्हा परिषद अहमदनगर येथे पाठपुरावा करून निवेदन देऊन उपोषणास बसणार आहे
अखिल भारतीय मानवाधिकार मिशन जिल्हा अध्यक्ष
धनंजय माने
मी स्वतः कामाची पाहणी केलेली आहे कामामध्ये काही त्रुटी आहेत असे दिसते टाकण्याचे सांगितले आहे कदाचित पाणी टाकल्याने रस्ता आवळून येईल व पक्का होईल असे वाटते.
पंचायत समिती इंजिनियर
श्री गोराडे.
ग्रामपंचायत यंत्रणा काम चालू असताना दुर्लक्ष करते त्याचे परिणाम मी ठेकेदार यांचा फायदा घेतात मटेरियल कमी वापरणे मटेरियल भेसळयुक्त वापरणे त्यामुळे कामाची क्वालिटी ढासळते हे आपल्याला या कामावरून दिसून येते सबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी ठेकेदाराकडून काम चांगल्या दर्जाचे करून घेऊन दोषींवर कारवाई नाही केली तर जिल्हा परिषद येथे उपोषणास बसणार आहे.
माजी सरपंच
संजय भिसे