राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेग यांनी हजारोंच्या उपस्थितीत जाऊन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल
राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेग यांनी हजारोंच्या उपस्थितीत जाऊन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल.
*श्रीरामपूर (प्रतिनिधी):-श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेग यांनी हजारोंच्या उपस्थितीत जाऊन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीत चुरस निर्माण झाले आहे.*
मुंबईत उमेदवारीचा काथ्या कुट चालू असतानाच श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेग यांनी कोणत्याही राजकीय पक्षाच्या उमेदवारीची वाट न बघता युवकांच्या व हिंदूं मतांच्या विश्वासावर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महिनाभर अगोदरच तयारी सुरू केलेली होती. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील हजारो युवक व हिंदू धर्मियांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरोधात आवाज उठवणारा आजपर्यंत एकही लोकप्रतिनिधी न झाल्याने आपण युवकांच्या आग्रहा खातर उमेदवारी अर्ज भरत आहोत असे सागर वेग यांनी यावेळी सांगितले . श्रीरामपूर हे महाराष्ट्रातील एकमेव असे शहर आहे की ज्याचे नाव प्रभू श्रीरामांच्या पवित्र नावाने घेतले जाते त्या श्रीरामपूर तालुक्याला जिल्ह्याचा दर्जा मिळावा यासाठी कोणीही भरीव अशी मोहीम कधी राबवलेली नाही तसेच श्रीरामपूर एमआयडीसी मध्ये बाहेरील मोठमोठाले उद्योग आणून तालुक्यातील हजारो युवकांचा रोजगाराचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न केलेला नाही तसेच हिंदू धर्मीयांवर होणारे अन्याय व अत्याचार यावरही सेक्युलर लोकप्रतिनिधींनी कधीही आवाज उठवलेला नाही या सर्व प्रश्नांसाठी मी उमेदवारी अर्ज भरावा अशी मागणी जोर धरत होती म्हणून अपक्ष का होईना उमेदवारी अर्ज भरला असून माझी निवडणूक ही युवकांनीच हाती घेतली आहे असा विश्वास याप्रसंगी सागर बेग यांनी व्यक्त केलेला आहे
स्वयंवर मंगल कार्यालय या ठिकाणाहून सकाळी साडे अकराच्या दरम्यान निघालेल्या भव्य पायी पदयात्रेद्वारे डीजे च्या तालात प्रशासकीय कार्यालय या ठिकाणी हजारो च्या संख्येने तालुक्यातील युवक व ज्येष्ठ नागरिक ,महिला या पदयात्रेस उपस्थित राहून श्रीरामपुरात न भूतो न भविष्यती याचे दर्शन घडवीत सागर बेग यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे.